Maharashtra Lok Sabha Election : अकोल्यात भाजपची महत्त्वाची बैठक; उमेदवारांबाबत काय घेणार निर्णय? जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार विजयाची क्षमता हाच निकष लावून भाजपचनं काल अकोल्यात प्रचाराचा नारळ फोडला आणि आज लोकसभा निवणुकीची बैठक पार पड़त आहे.
Maharashtra Lok Sabha Election
Maharashtra Lok Sabha ElectionSaam Digital
Published On

Maharashtra Lok Sabha Election

आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार विजयाची क्षमता हाच निकष लावून भाजपचनं काल अकोल्यात प्रचाराचा नारळ फोडला आणि आज लोकसभा निवणुकीची बैठक पार पड़त आहे. विशेष म्हणजे या बैठकीला अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर मतदारसंघाचे सर्व आमदार उपस्थित आहेत. या बैठकीत भाजप नेमक्या काय सूचना आणि मार्गदर्शन केल्या जातात, हे पाहण महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे याच बैठकीत अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

अकोल्यात भाजपच्या आढावा बैठकीला सुरुवात झालेली आहे. बैठकीस्थळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बाय कार प्रवास करत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन फडणवीस करणार आहेत. अकोला लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे. अकोला शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावर लगतच्या सिटी स्पोर्ट क्लब इथं ही बैठक सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 : ४०० पारसाठी भाजपसमोर असेल खडतर आव्हान; कशा असतील उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील निवडणुका?

अकोल्यात भाजपच्या या संघटनात्मक बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय संघटनमंत्री के. शिवप्रसाद हेही उपस्थित आहे. भाजपची ही अकोला लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठक सुमारे 3 वाजता सुरू झालीय.भाजपचे अकोला लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनूप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह आजी माजी आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. सोबतचं रिसोड मतदारसंघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारीही बैठकीत हजर आहे. या बैठकीत काय सूचना आणि मार्गदर्शन केल्या जातंय. हे पाहण महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे याच बैठकीत अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Lok Sabha Election
Madha Lok Sabha Constituency : माेहिते पाटील 'माढा'त शिवसैनिकांना करु लागले आपलसं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देणार शह?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com