Standard Deduction Saam Tv
बिझनेस

Standard Deduction: स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय? कोणाला होतो फायदा? किती रुपये वाचतात?

What Is Standard Deduction: अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीनुसार, स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ७५००० रुपये करण्यात आली आहे. स्टँडर्ड डिडक्शनवर तुम्हाला कर भरावा लागत नाही.

Siddhi Hande

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नोकरदारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. नोकरदारवर्गासाठी निर्मला सितारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. नवीन टॅक्स रिजीमनुसार वर्षाला १२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. दरम्यान, स्टँडर्ड डिडक्शन ७५ हजार रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला १२.७५ लाखांवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे काय? (What Is Standard Deduction)

स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे नोकरदार वर्गाच्या उत्पन्नातून आधीच एक निश्चित रक्कम कमी केली जाते. त्यामुळेच त्या व्यक्तीचं कमी होतं. परिणामी त्याला कमी कर भरावा लागतो. प्राप्तिककर कायदा १९६१ च्या कलम १६ अन्वयेनुसार स्टँडर्ड डिडक्शनचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न जास्त असो किंवा कमी तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम वजा करण्याची मुभा असते.

स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा (Standard Deduction Benefits)

स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा पगारदार व्यक्ती आणि पेन्शनधारकांना होतो. वार्षिक करपात्रा उत्पन्नातून स्टँडर्ड डिडक्शनची रक्कम थेट कमी होते. नवीन कर प्रणालीनुसार, करदात्यांना ७५००० रुपये स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा होणार आहे. तर जुन्या करप्रणालीनुसार ५०,००० रुपयांचा स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा होणार आहे.म्हणजेच तुम्हाला १२००० उत्पन्न आणि ७५००० रुपये स्टँडर्ड डिडक्शनवर टॅक्स भरावा लागणार नाही.

आयटीआर फाइल करताना स्टँडर्ड डिडक्शनचा करावा लागतो दावा (ITR Filling)

आयटीआर फाइल करताना तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शनसाठी दावा करावा लागतो. यामुळे तुम्हाला नवीन कर प्रणालीनुसार ७५००० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे. तर जुन्या कर प्रणालीनुसार ५०,००० रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनवर कर भरावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना फॉर्म १६ दिला जातो. त्यामुळे स्टँडर्ड डिडक्शनवर टॅक्स लागत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2025 NaraliPurnima : नारळी पौर्णिमेचे दुसरे नाव काय आहे?

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT