PM Vishwakarma Yojana Saam Tv
बिझनेस

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

PM Vishwakarma Scheme Detailed Udpates: सरकारने नागरिकांसाठी पीएम विश्वकर्मा योजना राबवली आहे. विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

Siddhi Hande

Government Scheme for New Businesses: मोदी सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.सरकारने देशातील नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना राबवली आहे. पीएम विश्वकर्मा योजना मागील वर्षी १७ सप्टेंबर २०२३ ला सुरु करण्यात आली होती. या योजनेला वर्ष पूर्ण झाले आहे.यानिमित्त वर्ध्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात उपस्थित आहेत.

पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय?

नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत नागरिकांना ३ लाखांपर्यंत कर्ज मिळते. कोणत्याही हमीशिवाय सरकारी तुम्हाला हे कर्ज दिले जाते. या योजनेत १८ ट्रेडमधील लोक अर्ज करु शकतात.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना स्किल ट्रेनिंगदेखील दिले जाते.लोहार, मूर्तिकार, धोबी, लोहार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ही मदत केली जाते. जेणेकरुन त्या लोकांना स्वतः चा व्यवसाय सुरु करता येईल. देशभरातील तब्बल ३० लाख नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतः चा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेत सुरुवातीला १ लाख रुपये दिले जातात. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २ लाख रुपये दिले जातात. तसेच स्कील डेव्लपमेंट प्रोग्रामसोबत ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.या योजनेत १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. www.pmvishwakarma.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! भरधाव एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Mumbai-Pune : ना माथेरान ना लोणावळा, रिमझिम पावसात फिरा मुंबई-पुण्याजवळील 'ही' १० स्वर्गाहून सुंदर ठिकाणे

संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे! नाश्त्याला अंडी खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे माहीत आहेत का?

Maharashtra News Live Update: पुणे शहर पाणी कपातीवर दोन दिवसांत निर्णय

Mumbai News : मोठी बातमी! लाइव्ह म्युझिक कार्यक्रमादरम्यान व्यक्तीचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT