केंद्र सरकारने २०२३ मध्ये विविध क्षेत्रातील कामगारांसाठी पीएम विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते किट वाटप करण्यात येणार आहे. वर्ध्यात स्वावलंबी मैदानावर सभा होण्याची शक्यता आहे. १९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी विदर्भात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाखो लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय?जाणून घेऊया.
केंद्र सरकारने नागरिकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अनेक योजना सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नागरिकांना स्किल ट्रेनिंग दिले जाते. त्याचसोबत त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरावर लोन दिले जाते.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लोहार, मूर्तिकार, धोबी, लोहार या क्षेत्रातील कामगारांना मदत केली जाते. या कामगारांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. देशभरातलील तब्बल ३० लाख कामगारांना या योजनेचा फायदा होणार आहे.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत १८ ट्रेडना लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ३ लाखांचे लोन दिले जाते. व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल म्हणून ही मदत केली जाते. याचसोबत स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिले जाते.
पीएम विश्वकर्मा योजनेत लोन दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. व्यवसाय सुरु करण्यासाठी १ लाख रुपये आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २ लाख रुपये दिले जातात. या कर्जावर ५ टक्के व्याजदर आकारले जाते. तसेच स्किल डेव्लपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामसोबत ५०० रुपयांची स्टायपेंड दिली जाते.
या योजनेसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तुम्ही www.pmvishwakarma.gov.in या वेबसाइटवरुन अर्ज भरु शकतात. या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांना आर्थिक मदत मिळते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.