Pink E-Rikshaw Scheme Saam Tv
बिझनेस

Pink E-Rikshaw Scheme: पिंक ई रिक्षा योजना आहे तरी काय? किती अनुदान मिळणार? वाचा सविस्तर

Pink E Rikshaw Scheme : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास पिंक ई रिक्षा योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांना रोजगाराची संधी मिळावी, तसेच त्यांना बिझनेस सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी आर्थिक मदत केली जाते. यानंतर आता राज्य शासनानेही महिलांना स्वतः च्या पायावर उभं करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरु केली आहे.

महाराष्ट्र सरकारने पिंक ई रिक्षा सुरु केली आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरु केली आहे. गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना राबवली असून पुणे आणि पिंपरी - चिंचवड परिसरात जवळपास 3 हजार 400 महिलांना ई पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत. त्यापैकी पुणे शहरात 2 हजार 800 महिलांना या रिक्षा देण्यात येणार आहेत.

ई- पिंक रिक्षा आहे तरी काय? (What is Pink E Rikshaw Scheme)

ई-पिंक रिक्षा ही एक योजना आहे. या योजनेत राज्य सरकार महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते. पिंक रिक्षा चालवून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. ही रिक्षा विकत घेण्यासाठी अनुदान दिले जाते. ज्यामुळे महिलांवर खर्चाचा जास्त भार पडत नाही.

'ई पिंक रिक्षा' योजनेत रिक्षाच्या एकूण रक्कमेवर राज्य शासनाकडून २० टक्के अनुदान दिले जाते. तसेच ७० टक्के रक्कम बँकेच्या माध्यमातून कर्जाच्या स्वरुपात दिली जाते. उरलेली १० टक्के रक्कम लाभार्थी महिलांना दिली जाते.

पात्रता (Pink E Rikshaw Scheme Eligibility)

अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

२१ ते ४० वयोगटातील महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

महिलांना फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेच्या अर्जदार महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ घेत नसावा.

महिला कर्जबाजारी नसावी.

कर्ज परतफेड करण्याची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT