Lek Ladki Scheme Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Yojana: PM मोदींनी शुभारंभ केलेली 'लेक लाडकी योजना' काय आहे? प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये मिळणार

Lek Ladki Scheme: राज्यातील प्रत्येक मुलींसाठी संजीवनी ठरेल अशा 'लेक लाडकी योजेन'चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलं आहे. नेमकी काय आहे ही योजना? जाणून घेऊ

Satish Kengar

Lek Ladki Yojana:

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी राज्यात विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. यासोबतच राज्यातील प्रत्येक मुलींसाठी संजीवनी ठरेल अशा 'लेक लाडकी योजेन'चं त्यांनी नवी मुंबई येथील एका कार्यक्रमात शुभारंभ केलं आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना 1 लाख रुपये मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेली 'लेक लाडकी योजना' नेमकी काय आहे. याचा लाभ राज्यातील मुलींना कसा मिळेल, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. (Latest Marathi News)

या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. माझी कन्या भाग्यश्री ही योजना (Majhi Kanya Bhagyashree Yojana) अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना (Government Schemes for Girl Child) राबविण्यात येईल.

मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल.

कोणाला मिळणार लाभ?

मागील वर्षी म्हणजेच १ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

SCROLL FOR NEXT