देशातील सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कव्हरेज वाढण्याची शक्यता

Budget 2024: देशाचे नवीन अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या नवीन अर्थसंकल्पात सर्वसामान्यांमाना मोठा दिलासा मिळू शकतो. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या आरोग्य विमा कव्हरेज वाढवण्याची शक्यता आहे.
Ayushman Bharat Scheme
Ayushman Bharat Scheme Saam Tv
Published On

Ayushman Bharat Scheme Increase Health Insurance:

देशाचे नवीन अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. या नवीन अर्थसंकल्पात सर्वसामान्यांमाना मोठा दिलासा मिळू शकतो. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या आरोग्य विमा कव्हरेज वाढवण्याची शक्यता आहे.

सरकार सध्या उपाचारासाटी किंवा रुग्णालयात दाखल झालेल्या कुटुंबासाठी प्रति वर्ष ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देते. आता सरकार विमा संरक्षण ५० टक्क्यांनी वाढवू शकते. जर सरकारने आरोग्य विमा कव्हरेज ५० टक्क्यांनी वाढवले तर कव्हरेज ७.५० लाख रुपयांपर्यंत वाढेल. (Latest News)

१ फेब्रुवारी २०२४ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात ही नवीन घोषणा होऊ शकते. आयुष्यमान योजनेतील कव्हरेज वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला जाण्याची अपेक्षा आहे. याबाबत अंतिम निर्णय घेणे बाकी आहे.

आयुष्मान भारत योजना

आयुष्मान भारत योजना ही सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज मिळण्यासाठी राष्ट्रीय सेवा स्वास्थ्य नीती २०१७ अंतर्गत ही योजना राबवण्यात आली. २३ सप्टेंबर २०१८ ला ही योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत PM JAY योजना येते. ही सर्वात मोठी आरोग्य योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत अनूसूचित जातींची कुटुंबे, गरीब लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. १६ ते ५९ वर्षांतील वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Ayushman Bharat Scheme
Stock Market Today: शेअर बाजारात जबरदस्त खरेदी; सेन्सेक्सने घेतली 791 अंकानी उसळी, निफ्टीने केला नवा विक्रम

आयुष्मान कार्ड

आतापर्यंत २५.२१ कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड बनवण्याच आले आहे. लवकरच ही संख्या ३० कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. या योजनेअंतर्गत ५.६८ कोटींहून अधिक नोंदणीकृत रुग्णालये आहेत.

Edited By-Siddhi Hande

Ayushman Bharat Scheme
QLED 8K Projector: घरातच मिळणार सिनेमागृहाचा आनंद! सॅमसंगने लॉन्च केला पहिला वायरलेस 8K प्रोजेक्टर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com