Stock Market Today: शेअर बाजारात जबरदस्त खरेदी; सेन्सेक्सने घेतली 791 अंकानी उसळी, निफ्टीने केला नवा विक्रम

Share Market today update: निफ्टीने विक्रम रचत आज ऑल टाइम हाय लेव्हलवर ट्रेड करत होता. निफ्टी इंडेक्स 200 अंकानी उसळी घेत 21,848.20 च्या पार गेला आहे. तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्सने 791 अंकानी उसळी घेतली आहे.
Share Market Opening Update Today
Share Market Opening Update TodaySaam Tv
Published On

Share Market:

शेअर बाजारात सकाळी जबरदस्त खरेदी झाली. त्यानंतर दुपारी शेअर बाजारात नवा विक्रम पाहायला मिळाला आहे. निफ्टी आज ऑल टाइम हाय लेव्हलवर ट्रेड करत होता. निफ्टी इंडेक्सने 200 अंकानी उसळी घेत 21,848.20 च्या पार गेला. तर दुसरीकडे बीएसई सेन्सेक्सने 791 अंकानी उसळी घेतली. त्यामुळे बीएसई सेन्सेक्स 72,513 अंकावर पोहोचला. तर आज आयटी सेक्टरमधील इन्फोसिसच्या शेअरमध्येही तेजी पाहायला मिळाली. (Latest Marathi News)

गुरुवारी निफ्टी 21,647.20 अंकावर पोहोचला. तर शुक्रवारी निफ्टी 21,773.55 वर खुला झाला. तर आज शुक्रवारी दुपारी निफ्टी 21,848.20 वर पोहोचला. दुसरीकडे सेन्सेक्स शुक्रवारी 72,148.07 वर खुला झाला. त्यानंतर आज 1.10 टक्क्यांनी उसळी घेऊन 72,513 अंकावर पोहोचला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Share Market Opening Update Today
Whatsapp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपवर आलं नवं फीचर, चॅटिंग करताना येणार धम्माल; असा अनुभव घ्या

आयटी सेक्टरमध्ये तेजी

शेअर बाजारात आज शुक्रवारी आयटी सेक्टरच्या शेअरमध्ये जबरदस्त तुफानी पाहायला मिळाली. इन्फोसिसच्या (infosys) शेअरमध्ये ४२ महिन्यांनतर मोठी तेजी पाहायला मिळाली. या शेअरने ७.५५ टक्क्यांनी उसळी घेऊन 1,687 रुपयांमध्ये प्रति शेअर व्यवहार सुरु आहे. विप्रोच्या शेअरने 4.09 टक्क्यांनी उसळी घेऊन त्यांचा शेअर हा 466.55 रुपये प्रति शेअरवर पोहोचला. तर टीसीएसच्या शेअरने ४ टक्क्यांनी उसळी घेऊन प्रति शेअर 3,883 रुपयांवर पोहोचला आहे.

Share Market Opening Update Today
Kanya Sumangala Yojana : नुकत्याच जन्मलेल्या मुलींना सरकार देणार २५००० रुपये, कोणाला आणि कसा मिळणार लाभ?

गुतंवकणूकदारांची कोटींची कमाई

शेअर बाजारात आज चांगलीच तेजी पाहायला मिळाली. कारण आज बीएसई सेन्सेक्सने उसळी घेतली. आज गुंतवणूकदारांची चांगलीच कमाई केली. आज शुक्रवारी एकूण गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत २.५ लाख कोटींनी वाढ झाली आहे. दरम्यान, बीएसईच्या ३० शेअरपैकी १९ शेअरने तेजी पाहायला मिळाली. तर ११ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. (Share Marekt Today)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com