Aadhar Card : पालकांसाठी महत्वाची बातमी! लहान मुलांचं आधार कार्ड 'या' वयापर्यंत करा दोनदा अपडेट, अन्यथा...

Aadhar Card Update News: लहान मुलांचं आधार कार्ड त्यांच्या वयाच्या १५ वर्षापर्यंत दोनदा अपडेट करणं गरजेचं आहे. अन्यथा मोठ्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
Bal Aadhar Card
Bal Aadhar Card Saam Tv
Published On

Update Aadhaar Card Twice For Children

आजच्या युगात आधार कार्ड हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी आधार कार्ड गरजेचं आहे. नवजात मुलांसाठीही आधार कार्ड बनवलं जातंय. हे आधार कार्ड दोनदा अपडेट करणं गरजेचे आहे, असं न केल्यास गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ही समस्या कोणती आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेवू या. (latest news)

जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवत असाल, तर ते दोनदा अपडेट करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा ते निष्क्रिय होवू शकतं. वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर बायोमेट्रिक्स अपडेट करणं देखील आवश्यक (Update Aadhaar Card) आहे.

बाल आधार म्हणजे काय

आजकाल अनेकांचे आधार कार्ड कोणत्या ना कोणत्या कारणाने अपडेट केलं जातंय. लहान मुलांचं आधार कार्डही तितकंच काळजीने अपडेट करणं गरजेचं आहे. यात हलगर्जीपणा केल्यास ते निष्क्रीय होवू शकतं. त्यामुळं लहान मुलांच्या आधारकडे लक्ष देण्याची गरज (Aadhaar Card)आहे.

पाच वर्षांखालील मुलांसाठी जारी केलेल्या आधार कार्डचा रंग निळा असतो. त्या कार्डला बाल आधार कार्ड असं म्हणतात. लहान मुलांचे आधार कार्ड दोनदा अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे. मूल ५ वर्षे आणि १५ वर्षांचे झाल्यावर त्याचं आधार कार्ड अपडेट करायला हवं. ५ वर्षांनंतर बायोमेट्रिक्स अपडेट न केल्यास मुलाचं आधार (Baal Aadhaar Card) निष्क्रिय होतं. त्यामुळं लहान मुलं ५ आणि १५ वर्षांचं झाल्यावर बायोमेट्रिक्स अपडेट करणं आवश्यक आहे.

Bal Aadhar Card
Kisan Credit Card Benefits : शेतकऱ्यांना सहज मिळणार लाखोंचं कर्ज, केंद्र सरकारची खास योजना; कसा कराल अर्ज?

आधार कार्ड कसं अपडेट करायचे

देशभरातील मोठ्या शहरांमध्ये UIDAI आधार सेवा केंद्र सुरू आहेत. येथे जाऊन मुलांचे आधार अपडेट करता येईल. जर एखाद्याचं आधार कार्ड दुसर्‍या राज्यातील असेल आणि तो सध्या दिल्लीत राहत असेल, परंतु त्याला त्याचा पत्ता हा त्याच्या आधारमधील जुन्या पत्त्यासारखाच राहावा असे वाटत असेल, तर तो त्याच्या वडिलांच्या जुन्या पत्त्याचा पुरावा सादर करून अपडेट मिळवू शकतो.

Bal Aadhar Card
Aadhar Card: आधार कार्ड क्रमांक नसतानाही सोप्या पद्धतीने करा eKYC; या स्टेप्स करा फॉलो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com