Aadhaar Card Rule meta ai
बिझनेस

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये जन्मतारीख बदलायची आहे? UIDAI चा हा नियम नक्की जाणून घ्या

Adhaar Update : आधार कार्डामध्ये जन्मतारीख दुसऱ्यांदा बदलायची असेल तर UIDAIचे विशेष नियम लागू होऊ शकतात. जन्म प्रमाणपत्र, वैध कागदपत्रे आणि आवश्यक पडताळणीबाबत महत्त्त्वाची माहिती जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

आधार कार्डामध्ये जन्मतारीख चुकीची नोंद झाली असेल आणि ती पुन्हा दुरुस्त करायची असेल, तर हा बदल नेहमीच्या अपडेट प्रोसेससारखा सोपा नसेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जन्मतारीख बदलण्याबद्दल काही महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत. यामध्ये दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर जन्मतारीख बदलण्याच्या विनंतीची अधिक तपासणी केली जाऊ शकते.

UIDAIच्या २४ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या नियमांनुसार, जन्मतारीख एकापेक्षा जास्त वेळा बदलण्याची मागणी विशिष्ट परिस्थितीतच स्वीकारली जाऊ शकतो. त्यामुळे फक्त दुसरं ओळखपत्र दाखवून जन्मतारीख बदलणे शक्य होईलच असं नाही.

जन्म प्रमाणपत्र महत्त्वाचे

आधार कार्डामधली जन्मतारखेच्या दुरुस्तीसाठी जन्म प्रमाणपत्र हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. याआधी जर मार्कशीट, पासपोर्ट किंवा अन्य वैध कागदपत्राच्या मदतीने जन्मतारीख नोंदवली असेल, तर पुन्हा बदल करताना जन्म प्रमाणपत्रासारखा मजबूत पुरावा मागितला जाऊ शकतो. याआधी जन्म प्रमाणपत्रच सादर केलं असेल आणि त्यामध्ये नंतर दुरुस्ती झाली असेल, तर त्याच जन्म नोंदणी क्रमांकाचे सुधारित प्रमाणपत्र आवश्यक ठरेल. काही प्रकरणांमध्ये शपथपत्र किंवा जास्त कागदपत्रंही मागितली जाऊ शकतात.

ऑपरेटरच्या चुकीमुळे जन्मतारीख बदलली असेल तर...

आधार नोंदणीवेळी नागरिकाने योग्य कागदपत्र दिले होते, मात्र ऑपरेटरकडून चुकीची जन्मतारीख नोंदवली गेली असेल, तर प्रकरण वेगळ्या पद्धीतने तपासलं जाऊ शकतं. मिळालेल्या रेकॉर्डवरून ही चूक सिद्ध झाल्याने नियमांनुसार सुधारणा करण्याची प्रोसेस लागू होऊ शकते. मात्र जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र दिल्याचे आढळले तर प्रकरण गंभीर होऊ शकतं. तपासादरम्यान आधार निष्क्रिय केला जाऊ शकतो आणि योग्य, ऑनलाइन पडताळणी करता येणारा पुरावा सादर करण्याची आवश्यकता भासू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाईची शक्यताही असू शकते.

वयाच्या श्रेणीचीही तपासणी

जन्मतारीख बदलल्यानंतर आधार तयार करताना व्यक्तीचे वय संबंधित श्रेणीत बसत नसल्याचं आढळल्यावरही तपासणी होऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये विनंती नाकारली जाण्याची किंवा आधार निष्क्रिय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : २३, २४ आणि २५ सप्टेंबरला राज्यात मुसळधार; पाहा तुमच्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट आहे का?

Eye Health : अचानक धूसर दिसतंय? रोजच्या या 7 सवयींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Homemade Collagen Cream: दररोज रात्री झोपण्यापूर्वी लावा 'ही' क्रीम वयाच्या चाळीशीतही राहील २५ वीसारखा ग्लो

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन!

Gold rate today : पितृपक्षापूर्वीच सोनं-चांदी अचानक स्वस्त! २ दिवसांत दरात एवढ्या हजारांची घसरण; पाहा आजचे नवे दर

SCROLL FOR NEXT