बिझनेस

Vivo V40 Series: एक, दोन नाही तर थेट ३ कॅमेरा असलेला स्मार्टफोन आला बाजारात; जाणून घ्या Vivo V40 Pro seriesचे फीचर्स

Vivo V40 Series Launched India: vivo कपंनीने नवीन स्मार्टफोन वी ४० लॉन्च केलाय. Vivo V40 Pro मध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आणि 5500mAh बॅटरी देण्यात आलीय. तर Vivo V40मध्ये Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आलाय.

Bharat Jadhav

Vivo कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर vivo v40 सीरिज हा फोन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. का, असा प्रश्न तुम्ही करत असाल तर त्याच्या उत्तर जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर जाणून घ्यावी लागेल. विवोच्या या नव्या सीरिजच्या डिझाईनची बरीच चर्चा आहे. मोबाईल डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसरबद्दल माहिती आपण घेऊया.

Vivo V40 Pro च्या प्रो व्हेरिएंटमध्ये देण्यात आलेला प्रोसेसर खूप चांगला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर देण्यात आलंय, तर स्टॅण्डर्ड व्हेरिएंटमध्ये Snapdragon7 Gen 3 प्रोसेसर मिळेल. तसेच Vivo 40 सीरीजमध्ये Zeiss ब्रँडेड रिअर कॅमेरा आणि 5500mAh ची बॅटरी देण्यात आलीय.

Vivo V40 प्रो मध्ये 6.78 इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. यात 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 4500 नाइट्सची पीक ब्राईटनेस देखील देण्यात आलाय. या मोबाईलचं वजन 192 ग्रॅम इतके आहे. Vivo V40 प्रोमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9200+ चिपसेट आहे. यात ऑक्टा-कोर सीपीयू आणि इम्मॉर्टलिस-जी 715 एमसी 11 जीपीयूचा समावेश आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप या मोबाईलमध्ये देण्यात आलाय.

50 एमपी वाइड लेन्स, 2 एक्स ऑप्टिकल झूमसह 50 एमपी टेलिफोटो लेन्स आणि 50 एमपी अल्ट्रा वाइड लेन्सचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅशसह 50 एमपी वाइड लेन्स आहे, हा कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. Vivo V40 प्रो ओटीजी सपोर्टसह वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी (मार्केट डिपेंडंट) आणि यूएसबी टाइप-सी 2.0 सपोर्ट करतो.

कंपनीने Vivo V40 Pro दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. यात 8GB RAM + 256GB स्टोरेजचा फोन खरेदी करण्यासाठी 49,999 रुपये खर्च करावे लागतील. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज असलेल्या प्रकारातील मोबाईल घ्यायचा असेल तर 55,999 रुपये खर्च करावे लागतील. Vivo V40 Pro ब्लू आणि टायटेनियम ग्रे रंगात उपलब्ध असणार आहे. हा फोन बाजारात विक्रीसाठी 13 ऑगस्टपासून उपलब्ध असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT