Vivo Y200e 5G Saam Tv
बिझनेस

Smartphone: आकर्षक लूक आणि तगडे फीचर Vivo Y200e 5G लवकरच होणार लाँच; जाणून घ्या सविस्तर

Vivo Y200e 5G: स्मार्टफोनमध्ये विवो ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. कंपनीचा Vivo Y200e 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vivo Y200e 5G Features And Specification :

स्मार्टफोनमध्ये विवो ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन फोन लाँच करत असते. कंपनीचा y सीरीजमधील एक स्मार्टफोन लवकरच लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन आकर्षक लूक आणि जबरदस्त फीचरसह बाजारात लाँच केला जाणार आहे.

येत्या काही दिवसांत Vivo Y200e 5G स्मार्टफोन लाँच होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. हा फोन Vivo Y100 च्या रिब्रँडेड व्हर्जनमध्ये लाँच केला जाईल. हा फोन नुकताच इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. (Latest News)

मीडिया रिपोर्टनुसार, Vivo Y200e 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिप्रेश रेटला सपोर्ट करणारा फ्लॅट डिस्प्ले दिला जाईल. हा फोन 5,000 mAh बॅटरीसह बाजारात लाँच केला जाणार आहे. ही बॅटरी 44 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेन. तसेच या फोनमध्ये ऑडिओसाठी ड्युअल स्टीरिओ स्पीकरदेखील दिला जाऊ शकतो. तसेच वॉटस स्प्लॅशसाठी IP 5G रेटिंग मिळू शकते. स्मार्टफोनमध्ये SM4450 प्रोसेसर दिला जाईल. तो दोन कार्टेक्ससह येईल. हा चिपसेट 8GB रॅमसह जोडला जाईल. Vivo चा हा स्मार्टफोन Android14 ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेल.

Vivo Y100 च्या रिब्रँडेड असलेल्या व्हर्जनमध्ये हा नवीन फोन लाँच करण्यात येईल. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये Vivo Y100 सारखा कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये 64MP OIS आणि 2MP सेन्सर आहे. असाच कॅमेरा Vivo Y200e 5G स्मार्टफोनमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT