veeba foods owner success story 
बिझनेस

Success Story : स्वप्नासाठी घर विकलं, आईच्या नावाने कंपनी उभारली, आज १००० कोटींचे साम्राज्य

veeba foods owner success story : विराज बहल यांची यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. वीबा फूड्सचे (Veeba Foods) संस्थापक असलेल्या विराज यांनी कोट्यवधींची कंपनी उभारली. ते शार्क टँक इंडियाच्या या सिझनमध्ये नवीन जज म्हणून आलेत.

Namdeo Kumbhar

Viraj Bahl's journey from setbacks to success : यशस्वी होण्यासाठी खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतो. लोकांना पैसा अन् स्टारडम दिसते. पण त्यामधील मेहनत, चिकाटी आणि यश दिसत नाही. प्रत्येक यशस्वी उद्योजकाचा वेगळा संघर्ष आहे, पण आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय यश दिसतच नाही. विराज बहल, हे त्यामधीलच एक नाव आहे. शॉर्क टँकच्या चौथ्या सिझनमध्ये ते जज म्हणून आले अन् त्यांच्या कंपनीच्या टर्नओव्हरची आण त्यांच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली. पण विराज बहल यांनी उभारलेली कोट्यवधींची संपत्ती आणि कंपनी अशीच मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी जिवाचे रान करावे लागलेय. विराज बहल यांच्या यशाची गाथा जाणून घेऊयात...

विराज बहल यांना FMCG क्षेत्रातील सॉस बनवणाऱ्या कंपनी वीबा फूड्सचे (Veeba Foods) संस्थापक म्हणून ओळखतात. 2013 मध्ये सुरू झालेली वीबा फूड्स आज एकदम भारतामधील प्रसिद्ध ब्रँड म्हणून ओळखला जातोय. विराज यांनी भारतीय फूड इंडस्ट्रीला एक नवी दिशा दिली. आज यश पायाशी लोळत असले तरी विराजचा प्रवास काही सोपा नव्हता. आयुष्यात आणि व्यवसायात त्यांना अनेक चढ-उतार आले. सुरुवातीला अपयश, आर्थिक अडचणी, आल्या. घर विकून व्यवसाय उभारला. विराज यांनी जिद्द न सोडता सर्व अडचणींना तोंड दिले. चिकाटी, श्रम आणि निश्चय याच्या बळावर आज १००० कोटींचे साम्राज्य उभारलेय.

फूड बिझनेससोबत लहानपणापासून नातं

विराज यांचं फूड बिझनेससोबत लहानपणापासूनच नातं राहिलेय. ते नेहमी आपल्या वडिलांच्या फॅक्टरीत जायचे. पहिली नोकरी दिल्ली ट्रेड फेअरमधल्या फन फूड्सच्या स्टॉलवर केली होती. लहानपणापासूनच फूड प्रोसेसिंगची आवड होती. पण विराज यांना वडिलांनी आर्थिकदृष्टी सक्षम होण्याचा सल्ला दिला. विराजने मग काय इंजिनिअरिंग केलं, मोठ्या पगाराची नोकरीही लागली. पण विराज यांचं मन कधीच नोकरीत लागले नाही. त्यांचं कल नेहमीच फॅमिली बिझनेसमध्येच असायचा.

वडिलांनी फन फूड्स विकलं

2002 मध्ये विराजने वडिलांच्या परवानगीने फन फूड्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीव बहल यांच्या नेतृत्वाखाली कंपनी नफ्यात होती, वेगाने वाढली. अवघ्या सहा वर्षांत विराज यांनी फन फूड्‍सला वेगळ्या उंचीवर नेहून ठेवलं. पण 2008 मोठा टर्निंग पॉइंट आला, कारण राजीव बहल यांनी फन फूड्सला जर्मन कंपनी Dr. Oetker ला 110 कोटींमध्ये विकलं.

घर विकून नवीन बिझनेससाठी पैसा उभारला -

विराज बहल यांनी २००९ मध्ये पॉकेट फुल नावाच्या रेस्टोरंटची सुरूवात केली. चार वर्षातच हा व्यवसाय तोट्यात आला अन् सगळे रेस्टोरंट बंद पडले.२०१३ मध्ये विराज यांच्यापुढे पुन्हा एक मोठं संकट उभारले, पण ते डगमगले नाहीत. अर्थिक संकट आलेच होते, त्यातही त्यांनी मार्ग काढला. पत्नीला विश्वासत घेत त्यांनी व्यवसाय उभारण्याचं ठरवले. आपलं घर विकून नव्या बिझनेससाठी पैसे जमवले. विराज पुन्हा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये परतले. 2013 मध्ये राजस्थान येथे वीबा फूड्सची स्थापना केली. त्यांतर मागे वळण्याचे नाव घेतले नाही. वीबा फूड्स आज देशातील प्रमुख कंपनीपैकी एक झाली.

अल्पवाधीच मोठं यश -

वीबा फूड्सनं गेल्या काही वर्षांत जबरदस्त प्रगती केली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने तब्बल 1000 कोटींचा महसूल मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हेच त्यांच्या यशाचं प्रमाण आहे. अद्याप वीबा फूड्स शेअर बाजारात सूचीबद्ध नाही, पण कंपनीत विराज यांची मोठी हिस्सेदारी आहे. विराज यांनी वीबा फूड्‍सच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये मोठी क्रांती केली आहे. विराज यांच्या कंपनीचे नाव विराजच्या आईच्या, विभा बहल यांच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT