अमेरिकेने भारतावर ५० टक्के कर लावला आहे. २७ ऑगस्ट २०२५ पासून भारतीय उत्पादनांवर २५ टक्के टॅरिफ कर लादला जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रोडक्ट्सवर ५० टक्के कर लादला जाणार आहे. अमेरिकेच्या म्हणण्यांनुसार, रशियाचे तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्यावर भारतावर अतिरिक्त २५ टक्के कर लादण्यात आला आहे. यानंतर आता लादलेल्या २५ टक्के करामुळे भारताला मोठा धक्का मिळाला आहे.
अहवालानुसार, आजपासून ५० टक्के कर लादला जाणार आहे. यामुळे भारताच्या ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर थेट परिणाम होणार आहे. यामुळे अनेक उद्योगांना फटका बसणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या मते, कापड, रत्ने-दागिने, कोळंबी, चामड्याच्या वस्तू आणि यंत्र यासारख्या गोष्टींना फटका बसणार आहे. यामुळे भारतातील निर्यात बाजारपेठेवर परिणाम होणार आहे. यामुळे थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
वाणिज्य मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, या टॅरिफ कराचा परिणाम ४८.२ डॉलर अब्ज किंमतीवर निर्यातीवर होणार आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी ६० टक्के निर्यात ही कापड, रत्ने, दागिने कोळंबी याची होती. त्यामुळे सर्वाधिक फटका या उद्योगांना होणार आहे.
सर्वाधिक फटका कोणत्या उद्योगांना बसणार (Tarrif Effect on These )
कोळंबी निर्यात- २.४ अब्ज डॉलर (विशाखापट्टणममधील मत्स्य शेतीला धोका)
हिरे दागिन्यांची निर्यात- १० अब्ज डॉलर (सूरत आणि मुंबईला फटका)
कापड उद्योग-१०.८ अब्ज डॉलरचा फटका बसण्याची शक्यता
कार्पेट आणि हस्तकला उद्योगाला १.२ अब्ज डॉलरचा फटका
बासमती, मसाले, चहासह कृषी उद्योगाला ५ अब्ज डॉलर फटका बसणार
स्टील, अॅल्युमिनियम, तांबे, सेंद्रीय रसायनाला फटका
चामडे, पादत्राणे, रसायने, इलेक्ट्रिकल उद्योगांना आर्थिक फटका
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.