बिझनेस

Stock Market Updates: ट्रम्प सरकार येताच शेअर बाजारात उसळी, टेक्नोलॉजीचे स्टॉक्सने घेतली भरारी

Stock Market अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला. ट्रम्प यांच्या विजयाने शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला असून शेअर्समध्ये उसळी आलीय.

Bharat Jadhav

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल आलेत, डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. डेमोक्रेट पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस यांना पराभव पत्कारावा लागलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम झालाय. ग्लोबल शेअर मार्केट वधारलाय. ट्रम्प यांच्या विजयामुळे TCS, Infosys,HCL, Tech, Wipro, आणि Dixon Tech सारख्या शेअर्सने उसळी घेतलीय. भारतीय शेअर बाजारात सकाळी तेजी पाहायला मिळाली होती.

ट्रम्प यांचा विजय जसा निश्चित झाला तोच भारतीय शेअर बाजारातही वाढ झाली. दरम्यान ट्रम्प सरकारची धोरण हे जागितक बाजाराच्या उपयुक्त समजले जातात. स्वत: डोनाल्ड ट्रम्प हे एक बिझनेस टायकून आहेत. त्यांचा बिझनेस हा अमेरिका, युरोपसह जगातील अनेक देशात आहे. भारतातही त्यांच्या परिवारामधील सदस्यांचा रिअस इस्टेट व्यवसाय आहे.

डोनाल्ड ट्रम्प आहेत बिझनेस टायकून

डोनाल्ड ट्रम्प भारतीय टेक्नोलॉजीच्या शेअर्संने उसळी घेतल्यांच पाहायला मिळालं. मोठ्या भारतीय आयटी कंपन्यांचा व्यापार हा अमेरिकेत आहे, त्या कंपन्यांना ट्रम्प यांच्या विजयाचा फायदा झाला. TCS, Infosys,HCL, Tech, Wipro, आणि Dixon Tech सारख्या शेअर्संन उसळी घेतलीय.

TCS - 3.74%

HCL Tech- 3.80%

Infosys- 3.80%

Wipro- 3.20%

जर शेअर्स बाजारात 2.20 वाजता BSE Sensex ८०० अंकांवर पोहोचला. 80,250 रुपयांच्या पार गेला. तर NSE Nifty मध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी 235 अंकांनी वर जात 24,450 वर पोहोचला. Emkay Globalनुसार ट्र्म्प यांच्या शेअर्स बाजारात शॉर्ट टर्म रॅली दिसली,यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प ४७ वे अध्यक्ष होणार

रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी किमान २७० मतांची आवश्यकता होती. ट्रम्प यांनी बहुमताचा आकाडा पार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalarth Id Scam: शालार्थ आयडी घोटाळ्याची पुण्यात पाळंमुळं,मास्टरमाईंडला लाच घेताना रंगेहात पकडलं

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सरकारला घरचा आहेर

Vasota Fort: सातारा जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वसलाय वासोटा किल्ला, पर्यटकांचे वेधून घेतोय लक्ष

टीचभर नेपाळची चीनसारखी वाकडी चाल; १०० रुपयांच्या नोटेवर ३ ठिकाणांवर दावा, भारताची सटकली!

BMC Election : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार; तेजस्वीनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात?

SCROLL FOR NEXT