US Elections : भारतात जन्मले, अमेरिकी निवडणुकीत ठरले किंग; राजा कृष्णमूर्ती सलग दुसऱ्यांदा जिंकले!

Indian Origin Raja Krishnamoorthi Win : अमेरिकेच्या निवडणुकीत मूळचे भारतीय असलेले राजा कृष्णमूर्ती सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. कृष्णमूर्ती यांचा भारतात जन्म झाला. तर अमेरिकेच्या बफेलोमध्ये ते लहानाचे मोठे झाले.
Raja Krishnamoorthi
US Presidential Election 2024social media
Published On

US Presidential Election 2024: 'मी पुन्हा येईन' म्हणत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकी निवडणुकीत विजयीपथावर आहेत. तर दुसरीकडे भारतात जन्मलेले डेमोक्रेट उमेदवार राजा कृष्णमूर्ती यांनी सलग दुसऱ्यांदा अमेरिकी निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी रिपब्लिकनच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभूत केलं. ताज्या कलानुसार, डेमोक्रेटच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या २०५ वर आघाडीवर आहेत. तर रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प २७० च्या जादुई आकड्याच्या जवळ पोहोचले आहेत.

कृष्णमूर्ती यांनी इलिनॉयच्या आठव्या काँग्रेश्नल डिस्ट्रिक्टमधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ते अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे प्रतिनिधीत्व करतील. त्यांनी ५७.१ टक्के मते मिळवून निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर रिपब्लिकन पार्टीचे मार्क राईस यांना ४२.९ टक्के मते मिळाली. कृष्णमूर्ती यांनी पहिल्यांदा २०१६ मध्ये निवडणूक जिंकली होती.

कोण आहेत राजा कृष्णमूर्ती (Who Is Raja Krishnamoorthi)

राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म भारतात झाला. पण ते अमेरिकेच्या बफेलोमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे शिक्षणही तिथेच झाले. काँग्रेसमध्ये जाण्याआधी त्यांनी इलिनॉयचे डेप्युटी स्टेट ट्रेझरपद सांभाळले आहे. ते इलिनॉयचे स्पेशल असिस्टंट अटर्नी जनरल आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे पॉलिसी डायरेक्टर होते. कृष्णमूर्ती हे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठीच्या धोरणांचे पुरस्कर्ते आहेत. त्यात शिक्षण, सामाजिक सुरक्षा आदी मुद्द्यांचा समावेश आहे.

Raja Krishnamoorthi
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पगार किती? भारताच्या राष्ट्रपतींपेक्षा जास्त मिळते वेतन?

कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प? (kamala harris vs donald trump polls)

मीडिया रिपोर्टनुसार, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २३० मते, तर कमला हॅरिस यांना २०५ मते मिळाली आहेत. २७० किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळवून विजयी होणाऱ्या उमेदवाराची राष्ट्रपतिपदी निवड होते. व्हाइट हाउसच्या शर्यतीत कोण जिंकतं, हे एरिजोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवादा, उत्तर कॅरोलाइना, पेन्सिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिनमधील निकालांवर अवलंबून असेल.

Raja Krishnamoorthi
US Election Result 2024: डोनाल्ड ट्रम्प Vs कमला हॅरिस, आतापर्यंत कोणत्या राज्यात कोण विजयी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com