Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: १०वी- १२वी नापास, तरीही पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अंजु शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Anju Sharma: आयुष्यात कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती सतत प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. असंच यश आयएएस अंजु शर्मा यांनादेखील मिळालं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड स्पर्धा परीक्षा आहे. अनेकांचे स्पर्धा परीक्षा देण्याचे स्वप्न असते. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. देशभरातील लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात. त्यात अनेकांना अपयश येते. परंतु कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती आपले प्रयत्न सुरु ठेवतो, तो यशस्वी होतोच. असंच यश आयएएस अंजु शर्मा यांना मिळालं आहे. (IAS Success story)

आयएएस अंजु शर्मा यांना १०वी आणि १२वीच्या परिक्षेत अपयश आले होते. तरीही त्या खचल्या नाहीत. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले.त्या आज आयएएस अधिकारी आहेत.

आयएएस अधिकारी अंजू शर्मा या बारावीत अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या होत्या. दहावीच्या प्री बोर्ड परिक्षेतदेखील त्या अपयशी ठरल्या होता. परंतु त्यांना तेव्हा इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळाले होते. अंजु शर्मा यांनी एकदा सांगितले होती की, लोक तुम्हाला तुमच्या कामगिरीमुळे ओळखतात.(UPSC Success Story)

१०वीत नापास झाल्यानंतर अंजु शर्मा या खूप खचल्या होत्या. परंतु या कठीण काळात त्यांच्या आईने त्यांना खूप साथ दिली. त्यांना प्रेरणा दिली. त्यांनी कॉलजेमध्ये जाण्याआधीच परिक्षेची तयारी सुरु केली होती. त्यांनी कॉलेजमध्ये असताना गोल्ड मेडल मिळवलं होतं.

अंजु शर्मा यांनी जयपूरमधील कॉलेजमधून बीएससी पदवी प्राप्त केली. त्यानंतर एमबीए पूर्ण केले. यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच यूपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा सर्व अभ्यास झाला होता.

अंजु शर्मा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. १९९१ साली त्यांची पहिली पोस्टिंग राजकोट येथे झाली. त्यावेळी त्या सहायक कलेक्टर होत्या. (IAS Anju Sharma Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT