आयुष्यात जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळते. आयुष्यात कितीही खडतर परिस्थिती असली तरी त्यावर मात करायची असते. हेच UPSC टॉपर इरा सिंघल यांनी दाखवून दिली आहे. इरा सिंघल यांची कहाणी आपल्याला प्रेरणा देईल. इरा सिंघल या दिव्यांग आहेत. तरीही त्यांनी खूप अभ्यास केला अन् यूपीएससी परीक्षा दिली. आज त्या IAS ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.
इरा सिंघल यांनी खूप मेहनत केली आणि अभ्यासात सातत्य ठेवले. त्या दिव्यांग विभाग, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रायलय आणि निती आयोगाच्या ब्रँड अॅम्बेसेडर आहेत.
इरा सिंघल या मूळच्या उत्तर प्रदेशमधील मेरठच्या रहिवासी. त्यांचे डीएम होण्याचे स्वप्न होते. त्या काही काळानंतर दिल्लीला शिफ्ट झाल्या. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या ७-८ वर्षांची असताना मेरठमध्ये राहत होत्या. तेव्हा एका दंगलीमुळे कर्फ्यू होता. तेव्हा तिने लोकांकडून ऐकले होते की, डीएम कर्फ्यू लावतात. त्यामुळेच ही जबाबदारी आपल्याला मिळावी म्हणून त्यांनी डीएम होण्याचे ठरवले. (Success Story)
इरा यांनी नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी दिल्ली येथून एमबीए पदवी प्रार्त केली. त्या एका मोठ्या कन्फेक्शनरी फर्ममध्ये स्ट्रॅटेजी मॅनेजर म्हणून काम करत होत्या. परंतु त्या या कामात समाधानी नव्हत्या. त्यामुळे त्यांनी बालपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
इरा सिंघल यांनी २०१०, २०११, २०१३ रोजी UPSC परीक्षा दिली होती. तिन्ही प्रयत्नात त्यांना IRS पोस्टिंग देण्यात आली होती. इरा यांनी सांगितले की, ६२ टक्के लोकोमोटर अंपगत्वामुळे या पदावर जाण्याची परवानगी दिली नव्हती.यानंतर आयआरएने केंद्रिय प्रशासकीय न्यायाधिकरण आयोगाविरोधात खटला दाखल केला. इथेही त्यांनी संघर्ष करावा लागला. इरा यांनी २०२४ साली ही केस जिंकली आणि त्यांची IRS साठी निवड झाली. त्यांमनी या काळातदेखील त्यांची श्रेणी सुधारण्याचा प्रयत्न केला.
२०१४ साली यूपीएससी परिक्षेत टॉप करुन नवीन इतिहास रचला. सर्वसाधारण गटात अव्वल ठरणारी इरा ही पहिली दिव्यांग व्यक्ती आहे. त्यांनी मणक्याचा त्रास आहे. (Success )
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.