Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: घर आणि नोकरी सांभाळत दिली UPSC; दोन लेकींची आई ४०व्या वर्षी झाली IAS; निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Nisa Unnirajan Success Story: आयएएस निसा उन्नीराजन यांनी वयाच्या ४० व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी घर आणि मुलींचा सांभाळत करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं.

Siddhi Hande

आयएएस निसा उन्नीराजन यांचा प्रेरणादायी प्रवास

४०व्या वर्षी झाल्या IAS अधिकारी

सलग ७ वेळा अपयश

घर आणि नोकरी सांभाळत दिली स्पर्धा परीक्षा

शिक्षणाला कोणतीही मर्यादा नसते. तसेच स्वप्न पूर्ण करण्यासाठीही वयाची अट नसते. तुम्ही कोणत्याही वयात आपली स्वप्ने पूर्ण करतात. त्यासाठी एकच मार्ग असतो तो म्हणजे मेहनत. जर तुम्ही मेहनत आणि सातत्य ठेवलं तर तुम्हाला नक्कीच यश मिळते. असंच काहीस केरळच्या निसा उन्नीराजन यांनी केलं. त्यांनी आयएएस पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. परंतु त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. त्याचे फळ म्हणून त्यांना यश मिळाले.

घर अन् नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी

केरळच्या निसा उन्नीराजन यांचा यूपीएससी परीक्षा देण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा पास केली. त्या दोन मुलींच्या आई होत्या. संसार अन् नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. रात्रीच्या शांततेत त्या अभ्यास करायच्या.

निसा यांना ऐकायला कमी येतं. परंतु त्यांनी आपल्या दृष्टीने हे यश मिळवलं आहे. निसा यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी उभे होते.त्यांचे पती आणि सासऱ्यांनी त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांनी घरातील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. त्यांनी परीक्षेची चांगली तयारी करावी यासाठी घरातील कामाला हातभार लावायच्या.

सलग ७ वेळा अपयश तरी हार मानली नाही

निसा यांना यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयश आले. त्यांना सात वेळा अपयश आले. परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. अखेर २०२४ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्या आयएएस झाल्या त्यावेळी त्या ४० वर्षांच्या होत्या. स्वप्न पूर्ण करायला कोणतीही मर्यादा नसते, याचे हे उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Lokhande Dance Video: 'मैं तो अपने साजन के द्वार चली रे...' अभिनेत्री अंकिता लोखंडेने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

मुंबईत महायुतीचा महापौर मराठीच! तुमचा महापौर कुठल्या मोहल्ल्यातून? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल|VIDEO

Skin Care : तीशीनंतर सुरुकुत्यांपासून बचाव करायचा असेल तर, या पाच गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा

'१९ डिसेंबरला नागपूरची व्यक्ती पंतप्रधान होणार'; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा, कारणही सांगितलं...

Maharashtra Live News Update: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला विशाल अगरवालचा जामीन

SCROLL FOR NEXT