UPS Calculator Saam Tv
बिझनेस

UPS Calculator: UPS की NPS; कोणत्या योजनेत कर्चाऱ्यांना मिळणार सर्वाधिक पेन्शन? कॅल्क्युलेटर लाँच

UPS Vs NPS: कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यासाठी युनिफाइड पेन्शन स्कीम आणि नॅशनल पेन्श स्कीम लाँच करण्यात आली आहे. यापैकी कोणत्या योजनेत तुम्हाला सर्वाधिक पेन्शन मिळणार हे जाणून घ्या.

Siddhi Hande

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस स्कीम सुरु केली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर चांगलीच पेन्शन मिळणार आहे. दरम्यान, यानंतर एनपीएस ट्रस्टने यूनिफाइड पेन्शन स्कीम कॅलक्युलेटरदेखील लाँच केले आहे.यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला एनपीएसअंतर्गत किती पैसे मिळणार हे कळणार आहे.

UPS म्हणजे काय? (Unified Pension Scheme)

यूपीएस म्हणजे युनिफाइड पेन्शन स्कीम. या योजनेतदेखील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. युनिफाइड पेन्शन स्कीममध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर सुरक्षित परतावा असतो. परंतु एनपीएसमधील परतावा हा पूर्णपणे गुंतवणूकीवर अवलंबून असतो. यूपीएसमध्ये मासिक पेन्शन निश्चित असेल परंतु लाभदेखील मर्यादित असू शकतो.

NPS म्हणजे काय? (National Pension Scheme)

एनपीएसअंतर्गत कर्मचाऱ्यांना पगारातील १० टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. सरकारकडून १४ टक्के रक्कम मिळणार आहे. एनपीएसमध्ये तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे तुमच्या गुंतवणूकीवर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही जेवढी जास्त रक्कम गुंतवाल तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळेल.

NPS कॅल्क्युलेटरचं काम (NPS Calculator)

कर्मचाऱ्यांसाठी NPS कॅल्क्युलेटर लाँच केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना आपले वय, कामाची वर्षे, पगारातील वाढ, महागाई भत्ता यासारखी माहिती लिहायची आहे. यानंतर तुम्हाला UPS आणि NPSमध्ये निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल याबाबत माहिती मिळेल.

दर महिन्याला किती पेन्शन मिळेल?

तुम्ही एनपीएस कॅलक्युलेटरमध्ये तुमचा पगार, वय ही माहिती टाकून तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळेल याबाबत माहिती मिळेल. दोन्ही योजनांमध्ये वेगवेगळा फायदा आहे. त्यामुळे तुमच्यासाठी जी गुंतवणूक योग्य आहे त्यात तुम्ही गुंतवणूक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT