UPI rule  google
बिझनेस

UPI Rule: सरकारचा मोठा निर्णय! UPI च्या नियमांत मोठा बदल, उद्यापासून होणार लागू

UPI Rule Change From 8th October: यूपीआयच्या नियमांत मोठा बदल करण्यात आला आहे. आता तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करताना पिन टाकायची गरज भासणार नाही.

Siddhi Hande

UPI च्या नियमांत मोठा बदल

पिन न टाकता करता येणार ट्रान्झॅक्शन

फिंगरप्रिंट आणि बायोमेट्रिकद्वारे करता येणार पेमेंट

सध्या देशात अनेकजण यूपीआय पेमेंट्सचा वापर करतात. डिजिटल पेमेंटमुळे अनेक गोष्टी अधिक सोप्या झाल्या आहेत. तुम्ही एका क्लिकवर कोणालाही पैसे पाठवू शकतात. दरम्यान, आता यूपीआयच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून हे नवीन नियम लागू होणार आहे.

यूपीआय म्हणजे यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवरुन ट्रान्झॅक्शन करणाऱ्या युजर्संना आता PIN टाकण्याची गरज नाही.पिन टाकण्याऐवजी तुम्ही फेस आयडेंटिफिकेशन किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करु शकणार आहात. उद्यापासून म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून ही सुविधा सुरु होणार आहे.

RBI ने नुकतीच याबाबत मार्गदर्शन तत्वे जारी केली आहे. त्यानुसार, तुम्ही फेस ऑथेंटिकेशन आणि फिंगरप्रिंटच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करु शकतात.

नवीन फीचर ८ ऑक्टोबरपासून होणार सुरु

NPCI हे फीचर ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये लाँच करणार आहे. यामुळे डिजिटल पेमेंट्स अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर आधार सिस्टीममध्ये असलेल्या बायोमॅट्रिक डेटाद्वारे पेमेंट प्रमाणित करेल. याचाच अर्थ असा की युजर्सचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट हा आधार डेटाशी जुळणार आहे. यामुळे पेमेंट अधिक सोयीस्कर होणार आहे.

RBI ची मार्गदर्शक तत्त्वे

डिजिटल व्यव्हारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. यामध्ये या नवीन फीचरमुळे डिजिटल पेमेंटमझ्ये सुरक्षितता आणि युजर्सचा अनुभव दोन्ही सुधारण्याची अपेक्षा आहे. सध्या युजर्संना प्रत्येक व्यव्हारांसाठी ४ किंवा ६ अंकी पिन टाकावा लागत आहे. आता हे नवीन फीचर लागू झाल्यानंतर फेस स्कॅन आणि फिंगरप्रिंट सेन्सर वापरुन पेमेंट करता येणार आहे. यामुळे ट्रान्झॅक्शनचा कालावधी कमी होणार आहे याचसोबत सुरक्षितता वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

BJP Leader Killed : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Yavatmal Politics: ठाकरे गटाच्या 13 पदाधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी; काय आहे प्रकरण?

Pune Honeytrap: PMPML मधील कंडक्टर महिलेचा प्रताप, तिघांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं, आता स्वतःच अडकली

टॉयलेटमध्ये तासनतास फोन घेऊन बसल्याने होऊ शकतात 'या' आरोग्याच्या समस्या

SCROLL FOR NEXT