UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

UPI Rule Change: यूपीआच्या नियमांत मोठा बदल करण्यात येणार आहे. यूपीआयने आता ट्रान्झॅक्शनची लिमिट वाढवली आहे. १५ सप्टेंबरपासून हे नवीन नियम लागू करणार आहेत.
UPI Rules
UPI RulesSaam tv
Published On
Summary

UPI च्या नियमात मोठे बदल

ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवली

१५ सप्टेंबरपासून लागू होणार नवीन नियम

आजकाल सर्वकाही ऑनलाइन डिजिटल पद्धतीने होते. आता कोणत्याही गोष्टीचे पेमेंट करताना अनेकजण यूपीआयचा वापर करतात. अनेकांच्या खिशात तर रोख रक्कमदेखील नसते. ऑनलाइन शॉपिंगपासून ते एसआयपी सर्वकाही ऑनलाइन यूपीआयद्वारे केले जातात. दरम्यान, यूपीआय वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूपीआयबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १५ सप्टेंबरपासून यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या लिमिटमध्ये मोठा बदल होणार आहे. एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे डिजिटल देवाणघेवाण खूप सोपी आणि सुरक्षित आहे.

UPI Rules
EPFO 3.0: आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार पीएफचे पैसे; EPFO 3.0 लवकरच होणार लाँच

आतापर्यंत यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही १ लाखांपर्यंत ट्रान्झॅक्शन करायचे. परंतु आता काही श्रेणींमध्ये ही मर्यादा कमी करण्यात होती. त्यामुळे आता NPCI ने मोठा निर्णय घेतला आहे. NPCI ने १२ कॅटेगरीतील ट्रान्झॅक्शनची सीमा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. याचसोबत दिवसाला पेमेंट करण्याची मर्यादादेखील वाढवली आहे.

या कॅटेगरीला मिळणार दिलासा

यूपीआयच्या या नवीन नियमाचा फायदा त्यांना होणार आहे जे लोक वीमा प्रिमियम भरतात किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. याचसोबत क्रेडिट कार्ड बिल भरणाऱ्यांना होता. याचसोबत ट्रॅव्हल किंवा बिझनेससंबंधित ट्रान्झॅक्शन करु शकतात.

UPI ट्रान्झॅक्शनची लिमिट

कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही १० लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकतात. विमा प्रिमियमची सीमा लाखांवरुन १० लाख करण्यात आली आहे. सरकारी ई-मार्केट प्लेसचीही लिमिट ५ लाखांवरुन १० लाख करण्यात आली. ट्रॅव्हल बुकिंगसाठीदेखील १० लाखांचे ट्रान्झॅक्शन करु शकतात. क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ६ लाखांचे ट्रान्झॅक्शन करु शकतात.ज्वेलरीसाठी ६ लाखांपर्यंत पेमेंट करु शकतात.

पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शनवर काय होणार परिणाम?

पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. पर्सन टू पर्सन पैसे पाठवण्यासाठी १ लाख रुपयांची लिमिट आहे. या लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

UPI Rules
UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

यूपीआयमध्ये काय बदल झाला?

NPCI ने सांगितले की, लोक खूप जास्त प्रमाणात डिजिटल पेमेंट करत आहेत. त्यामुळे मोठ्या रक्कमेचे ट्रान्झॅक्शन करण्याची मागणी वाढत आहेत. त्यामुळे यूपीआयमध्ये हा बदल खूप गरजेचा आहे.

UPI Rules
आता UPI पेमेंटसाठी मिळणार नवीन पर्याय! या कंपनीने सुरु केली सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com