Toyota Urban Cruiser Taisor to launch soon, It will compete with Kia Sonet and Mahindra XUV300 cars Saam Tv
बिझनेस

Upcoming Cars: पॉवरफुल इंजिन, डॅशिंग लूक; Toyota Cars घेऊन येत आहे नवीन SUV, Kia च्या या आकारला देणार टक्कर

Satish Kengar

Toyota Urban Cruiser Taisor

वाहन उत्पादक कंपनी टोयोटा आपल्या SUV सेगमेंटच्या कारमध्ये जबरदस्त बिल्ड क्वालिटी आणि हाय पॉवरट्रेन देते. 2024 मध्ये कंपनी आपली नवीन SUV कार Toyota Urban Cruiser Taisor लॉन्च करणार आहे. ही कार Maruti Suzuki Fronx, Hyundai Venue, Kia Sonet, Renault Kiger, Nissan Magnite आणि Mahindra XUV300 यांसारख्या आधीच बाजारात असलेल्या कारशी स्पर्धा करेल.

सध्या कंपनीने त्याच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ही टेस्ट दरम्यान बऱ्याचदा स्पॉट करण्यात आली आहे. मार्च 2024 पर्यंत ही कार सादर केली जाईल, असा अंदाज आहे. Toyota Urban Cruiser Taisor ही 5 सीटर SUV कार आहे. याची प्रारंभिक किंमत 12 ते 16 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम असू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारमध्ये 4 प्रकार आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळू शकते

Toyota Urban Cruiser Taisor ला हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स मिळू शकतात. Taisor ला पॉवर देण्यासाठी यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. ही कार ई, एस, जी आणि व्ही या चार प्रकारांमध्ये सादर केली जाईल. कारमध्ये अलॉय व्हील्सचा पर्यायही दिला जाणार आहे. (Latest Marathi News)

Taisor ही कंपनीची SUV कूप कार आहे. यात एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स डिझाइन . कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ आणि रूफ रेल असतील. ही Maruti Suzuki Fronx वर आधारित आहे. याचा पुढचा भाग हाय एंड बनवण्यात आला आहे, ज्यामुळे याला मस्क्युलर लूक मिळतो.

टोयोटाच्या या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीची सुविधा आहे. Toyota Urban Cruiser Taisor मध्ये 1.0 लीटर बूस्टर जेट टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील असेल. हे पॉवरफुल इंजिन 99 bhp पॉवर आणि 147 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT