Mahindra Thar 5 Door Saam Tv
बिझनेस

Mahindra Thar 5 Door या दिवशी होणार लॉन्च, कंपनीने तारीख केली जाहीर

Upcoming Cars: भारतात गेल्या काही महिन्यांपासून अनेक ग्राहक महिंद्रा थार 5 डोअर मॉडेलची वाट पाहत आहेत. अशातच थार लव्हरसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Satish Kengar

Mahindra Thar 5 Door:

भारतात गेल्या काही महिन्यांपासून अनेक ग्राहक महिंद्रा थार 5 डोअर मॉडेलची वाट पाहत आहेत. अशातच थार लव्हरसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी 5 डोअर थार भारतात लॉन्च होणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन मॉडेल सध्याच्या थारपेक्षा मोठे असेल, कारण त्याला आता दोन दरवाजे असतील, ज्याच्या मदतीने ही कार मागच्या बाजूला बसलेल्या लोकांना खूप सोयीस्कर ठरेल.

मिळणार दोन इंजिन ऑप्शन

Mahindra Thar 5 Door मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय ही कार 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देखील उपलब्ध असेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

5 डोअर मॉडेलमध्ये 2WD आणि 4WD पर्याय देखील दिले जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॉडेल निवडू शकता. अलीकडेच नवीन महिंद्रा थार टेस्ट दरम्यान दिसली आहे.  (Latest Marathi News)

एका रिपोर्ट्सनुसार, नवीन महिंद्रा थार 5 डोअरला सिंगल-पेन सनरूफ आणि रिमूव्हेबल पॅनल्ससह हार्ड टॉप व्हेरिएंट मिळू शकतो. सध्याच्या थारमध्ये सनरूफची सुविधा उपलब्ध नाही. नवीन थार 5-डोअर सध्याच्या Scorpio-N च्या लेदर-फ्रेम चेसिसवर आधारित असेल, जो सॉलिड स्टीलने बनलेला आहे. म्हणजेच नवीन मॉडेल देखील खूप मजबूत असेल.

किती असेल किंमत?

सध्या कंपनीने या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र सध्याच्या थारच्या तुलनेत 5 डोअर थारची किंमत सुमारे एक ते दोन लाख रुपयांनी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नवीन थारची किंमत 15 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. याची थेट स्पर्धा मारुती सुझुकी जिमनी आणि गुरखा यांच्याशी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT