Ather Energy: सर्वात मोठी सीट, वॉटरप्रूफ, पॉवरफुल बॅटरी! Ather च्या नवीन Electric Scooter ची बुकिंग सुरू

Ather Rizta News: नवीन दुचाकी उत्पादक कंपनी Ather Energy 6 एप्रिल रोजी आपली नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर Rizta लॉन्च करणार आहे. मात्र लॉन्चआधी या स्कूटरशी संबंधित अनेक महत्त्वाची समोर आली आहे.
Ather Energy New Electric Scooter
Ather Energy New Electric ScooterSaam Tv

Ather Rizta Pre-Bookings Open:

नवीन दुचाकी उत्पादक कंपनी Ather Energy 6 एप्रिल रोजी आपली नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर Rizta लॉन्च करणार आहे. मात्र लॉन्चआधी या स्कूटरशी संबंधित अनेक महत्त्वाची समोर आली आहे. कंपनी याची अधिकृत बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही स्कूटर बुक करू शकतात. यासाठी ग्राहकांना 999 रुपये टोकन रक्कम भरावी लागेल. कंपनीने Rizta मधील सेगमेंट-फर्स्ट अँटी-स्किड फीचर्सबद्दल माहिती दिली आहे.

ही स्कूटर अँटी-लॉक ब्रेक किंवा ABS सह येऊ शकते. भारतीय रस्त्यांची स्थिती लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने हे एक चांगले फीचर ठरू शकते. या स्कूटरमध्ये ग्राहकांना सर्वात मोठी सीट मिळेल आणि मोठ्या बूट स्पेससह मोठा फ्लोअरबोर्ड मिळेल. इतकंच नाही तर यात एक पॉवरफुल बॅटरी असेल ज्याची टेस्ट 40 फुटांवरून सुद्धा करण्यात आली आहे. ही स्कूटरही पूर्णपणे वॉटरप्रूफ असेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ather Energy New Electric Scooter
New Rules: क्रेडिट कार्डपासून ते फास्टॅगच्या नियमांपर्यंत, 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

रिझटाच्या टेस्टदरम्यान अनेक फीचर समोर आले आहेत. रिझटाचा आकार सध्याच्या Ather 450X लाइनअपपेक्षा मोठा आहे. हे बेंगळुरूच्याच रस्त्यांवर टेस्टदरम्यान दिसले आहे. रिझताच्या टेस्टदरम्यान त्यावर दोन लोक बसले होते. या ई-स्कूटरमध्ये मोठा फ्लोअरबोर्ड एरिया दिसतो. त्यावर काही सामान ठेवले होते, तरीही जागा दिसत होती. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक लांब सीट आहे. सीटच्या खाली एक मोठे बूट स्पेस देखील असल्याचं दिसलं. (Latest Marathi News)

टेल लॅम्प, फुल-एलईडी लाइटिंग, संपूर्ण डिजिटल स्क्रीन, राइड मोड, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, फास्ट चार्जिंग यांसारखी फीचर्स रिझटामध्ये मिळू शकतात. यासोबतच 12-इंचाची पुढील आणि मागील चाके रिअर ग्रॅब रेलसह असतील. हे एक पॉवरफुल इलेक्ट्रिक स्कूटर असेल. फॅमिली स्कूटर कन्सेप्ट लक्षात घेऊन यात अनेक फीचर्स दिली जाऊ शकतात. याच्या रेंज बद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र ही स्कूटर 150Km ची रेंज देऊ शकते, असं बोललं जात आहे.

Ather Energy New Electric Scooter
POCO C61 ची लॉन्च डेट झाली कन्फर्म, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Ather Rizta च्या या नवीन फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ब्रेकिंगसाठी दोन्ही व्हिल्सला डिस्क ब्रेक आहेत. तसेच सस्पेंशनसाठी टेलीस्कोपिक फोर्क्स समोर आणि मोनो-शॉक युनिट मागील बाजूस उपलब्ध असतील. स्कूटर नवीन मोटर सेटअप आणि बॅटरी पॅकसह येऊ शकतो. सध्याच्या 450X स्कूटर्सपेक्षा ती चांगली आणि हाय रेंज असेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय याचा टॉप स्पीडही जास्त असेल. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.25 ते 1.45 लाख रुपये असू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com