New Rules: क्रेडिट कार्डपासून ते फास्टॅगच्या नियमांपर्यंत, 1 एप्रिलपासून होणार हे मोठे बदल; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rules Change From 1st April 2024: 31 मार्च रोजी 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अशातच येणारा 1 एप्रिल अनेक नवीन बदल घेऊन येणार आहे.
Rules Change From 1st April 2024
Rules Change From 1st April 2024Saam Tv
Published On

Rules Change From 1st April 2024:

31 मार्च रोजी 2023-24 हे आर्थिक वर्ष संपणार आहे. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अशातच येणारा 1 एप्रिल अनेक नवीन बदल घेऊन येणार आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. यातच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देशात 1 एप्रिलपासून कोणते बदल लागू होणार आहे, याबाबत माहिती सांगणार आहोत.

येत्या 1 एप्रिलपासून एनपीएसच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. यातच जर तुम्ही फास्टॅग वापरत असाल तर तुम्हाला यासंबंधित काही महत्त्वाचं काम करावं लागणार आहे. तसं न केल्यास 1 एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, 1 एप्रिलपासून होणाऱ्या बदलांविषयी अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rules Change From 1st April 2024
Tax Saving Tips : ७ लाखांच्या टॅक्सवर करता येणार बचत, ITR फाइल करण्यापूर्वी ६ टिप्स लक्षात ठेवा

नॅशनल पेन्शन सिस्टिम

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरक्षित करण्यासाठी आधार आधारित टू स्टेप ऑथेंटिकेशन सिस्टिम सुरू केली आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे. (Latest Marathi News)

एसबीआय क्रेडिट कार्ड

एसबीआयच्या काही क्रेडिट कार्ड्सवरील पेमेंटवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स 1 एप्रिल 2024 पासून मिळणे बंद होणार. यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI Card Pulse आणि SimplyClick कार्डांचा समावेश आहे.

Rules Change From 1st April 2024
2000 Note Exchange : १ एप्रिलला २००० रुपयांची नोट बदलता येणार नाही, RBI ने दिली महत्त्वाची माहिती

फास्टॅग ई-केवायसी

जर तुम्ही अजून तुमच्या फास्टॅगचे ई-केवायसी केले नसेल, तर अशातच तुम्ही 31 मार्चआधी त्याचे ई-केवायसी करून घ्यावे. जर तुम्ही हे केले नाही. तर तुम्हाला 1 एप्रिलपासून फास्टॅग वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

एलपीजी गॅस सिलेंडर

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलतात. अशातच 1 एप्रिलपासून एलपीजी गॅसच्या किमतीत बदल होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com