Royal Enfield Upcoming Bikes:
Himalayan 450 वर आधारित नवीन बाईक Guerrilla 450 कंपनी भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या बाईकची टेस्ट अनेक दिवसांपासून सुरू आहे. टेस्टदरम्यान ही बाईक अनेक वेळा दिसली आहे. कंपनीची ही नवीन बाईक लाँग ड्राईव्हची आवड असलणाऱ्या लोकांना लक्षात ठेवून तयार करण्यात केली आहे.
हे नवीन मॉडेल पुढील महिन्याच्या अखेरीस भारतात लॉन्च केले जाऊ शकते. ही बाईक पॉवरफुल इंजिनसह येईल. या बाईकमध्ये उपलब्ध असलेल्या संभाव्य फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…
रॉयल एनफिल्डच्या नवीन बाईक Guerrilla 450 चे डिझाईन हंटर 350 सारखे असेल. या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात येणार आहेत. बाईकचे डिझाइन कॉम्पॅक्ट असण्याची शक्यता आहे. Guerrilla 450 नेमप्लेटसाठी ट्रेडमार्क दाखल करण्यात आला आहे. कंपनी पुढील महिन्यात ही बाईक लॉन्च करू शकते.
या नवीन मॉडेलमध्ये इंजिन ही सर्वात खास गोष्ट असणार आहे. सूत्रानुसार, नवीन Guerrilla 450 मध्ये 452cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर DOHC इंजिन मिळू शकते. जे 40.02 PS आणि 40Nm टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशनने सुसज्ज असेल. या बाईकला मिळणाऱ्या पॉवरनुसार या बाईकची संभाव्य किंमत 2.50 लाख रुपये एक्स-शोरूम असू शकते.
नवीन Guerrilla 450 मध्ये कंपनी अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करू शकते. रायडर्सच्या सोयीसाठी, बाईक मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन, राइड मोड, साइड-माउंटेड एक्झॉस्ट यासारखे फीचर्स मिळू शकतात. याशिवाय बाईकमध्ये राइड-बाय-वायर थ्रॉटलसह TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची सुविधा देखील असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.