Upcoming Cars: फक्त भारी नाही, तर जबरी! येतेय Honda Freed SUV, मिळणार हायब्रीड इंजिन

Honda Freed MPV: होंडा लवकरच आपली नवीन कार Freed बाजारात उतरवणार आहे. कंपनीने या कारचे जागतिक बाजारात अनावरण केलं आहे. ही एक बहुउद्देशीय कार आहे, ज्यामध्ये 5 आणि 6 सीटचे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

Honda Freed MPV
Honda Freed MPVSaam Tv

Upcoming Honda Freed MPV:

होंडा लवकरच आपली नवीन कार Freed बाजारात उतरवणार आहे. कंपनीने या कारचे जागतिक बाजारात अनावरण केलं आहे. ही एक बहुउद्देशीय कार आहे, ज्यामध्ये 5 आणि 6 सीटचे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. ही कार लवकरच भारतातही दाखल होण्याची शक्यता आहे.

ही होंडाची हायब्रीड कार आहे, ज्यामध्ये अतिरिक्त पॉवरसाठी इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. कारमध्ये 1.2 लीटर इंजिन असेल. जी रस्त्यावर पॉवर जनरेट करेल. ही कार 3 रो सीटिंग आणि 2 रो सीटिंग स्टाइलमध्ये सादर केली जाईल.


Honda Freed MPV
Ola च्या सर्वात स्वस्त स्कूटरची डिलिव्हरी सुरू, किंमत फक्त 69999; मिळणार 190Km ची रेंज

होंडा फ्रीडला ट्रेंडी लूक बंपर देण्यात आला आहे. यात स्टायलिश ग्रिल असेल. ही कार प्लॅस्टिक फेंडर एक्स्टेंशन आणि रूफ रेलसह उपलब्ध असेल. ही एक मोठ्या आकाराची कार आहे, ज्याची लांबी 4,310 मिमी, कारची रुंदी 1,695 मिमी आणि उंची 1,755 मिमी आहे. कारचा व्हीलबेस 2,740 मिमी ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे कमी जागेत ही कार सहज वळवता येते.

मिळणार 6 एअरबॅग्ज

कारच्या स्टीयरिंग व्हीलवर कंट्रोल स्विचेस देण्यात आले आहेत. याचा गियर लीव्हर डॅशबोर्डला पारंपारिक जागेपेक्षा थोडा वर जोडला गेला आहे. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी, मागील सीटवर चाइल्ड अँकरेज आणि सहा एअरबॅग्ज असतील.


Honda Freed MPV
Tata Altroz Racer येतेय, स्टायलिश लूक आणि अॅडव्हान्स फीचर्स; जाणून घ्या किती असेल किंमत

Honda Freed जून 2024 मध्ये जपानमध्ये लॉन्च होईल. त्यानंतर ही कार भारतात लॉन्च होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये लांब टेललाइट्स आणि एलईडी हेडलाइट्स असतील. कारचा फ्रंट लूक बॉक्सी करण्यात आला आहे. यात डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com