Tata Altroz Racer:
Altroz ही Tata Motors च्या मिड सेगमेंटमधील एक स्टायलिश कार आहे. आता कंपनी आपले नवीन अपडेटेड मॉडेल Racer घेऊन येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार जून 2024 मध्ये लॉन्च होईल. टाटा कारप्रेमी या कारची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. कंपनीच्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये ही एक जबरदस्त कार असेल, ज्यामध्ये स्पोर्टियर लूक आणि ड्युअल टोनमध्ये ऑरेंज कलरचा पर्याय असेल.
Altroz Racer मध्ये ग्राहकांना हाय पॉवर 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळू शकते. हेच इंजिन कंपनी त्याच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV Nexon मध्ये दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन असेल, जे रस्त्यावर हाय पॉवर जनरेट करेल. रस्त्यावर हाय स्पीड देण्यासाठी अल्ट्रोझ रेसरला 120 bhp पॉवर आणि 170 Nm पीक टॉर्क मिळेल. ही कंपनीची 6 स्पीड गिअरबॉक्स कार आहे. जी खराब रस्ते आणि पर्वतांवर चांगली परफार्मन्स देईल. यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ही कार 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.
नवीन Altroz Racer मधील ड्युअल-टोन पेंट स्कीम जुन्या कारपेक्षा वेगळे करेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधून समोर आले आहे की, तरुण पिढीला लक्षात घेऊन कंपनीने याचा बोनेट आणि छतावर दुहेरी रेसिंग पट्टे दिले आहेत. कारच्या फ्रंट फेंडरवर ‘रेसर’ बॅजिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे ही कार अधिक आकर्षक वाटते. जुन्या कारच्या तुलनेत या कारला नवीन स्टायलिश ग्रिल आणि नवीन अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याशिवाय यात लेदरेट अपहोल्स्ट्री, कॉन्ट्रास्ट स्टिचिंग आणि कलर डॅशबोर्ड आहे.
यात 10.25-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ग्राहकांना मिळेल. तसेच यात 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, व्हॉइस असिस्टेड सनरूफही ग्राहकांना मिळेल. यात चाइल्ड अँकरेज आणि मागील सीटवर अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.