24.8kmpl मायलेज, 6 एअरबॅग्ज; नव्या दमात नवीन Maruti Swift लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

New Swift Launched: देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली चौथी जनरेशन स्विफ्ट भारतात लॉन्च केली आहे. नवीन स्विफ्टमध्ये नवीन Z सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे.
New Maruti Swift
New Maruti SwiftSaam Tv

New Swift Launched:

देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली चौथी जनरेशन स्विफ्ट भारतात लॉन्च केली आहे. नवीन स्विफ्टमध्ये नवीन Z सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे. जे 14 टक्के अधिक मायलेज देते. मारुती सुझुकीने 2005 मध्ये पहिली जनरेशन स्विफ्ट भारतात लॉन्च केली होती आणि आत्तापर्यंत याचे भारतात 3 मिलियन ग्राहक आहेत.

म्हणजेच स्विफ्ट भारतात येऊन 19 वर्षे झाली आहेत. याचबद्दल बोलताना कंपनीने सांगितले की, भारतीय कार बाजार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नवीन स्विफ्टच्या निर्मितीसाठी कंपनीने 1450 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

New Maruti Swift
TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

किती आहे किंमत?

मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख ते 9.64 लाख रुपये आहे. ही कार 6 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात LXi, VXi, VXi (O), ZXi, ZXi+ आणि ZXi+ ड्युअल टोनचा समावेश आहे.

इंटीरियर

नेक्स्ट जनरेशन स्विफ्टमध्ये अगदी नवीन ब्लॅक इंटीरियर आहे, जे तरुणांना आकर्षित करते. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, वायरलेस फोन चार्जर आणि पुश बटण स्टार्ट/स्टॉप यांसारखे फीचर्स आहेत. कार सीट स्पोर्टी आहेत. यामध्ये जागेची कमतरता भासणार नाही. कारमध्ये मागील एसी व्हेंटची सुविधा आहे.

New Maruti Swift
13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

इंजिन आणि मायलेज

नवीन स्विफ्टमध्ये नवीन Z सीरीजचे पेट्रोल इंजिन आहे. जे 82hp पॉवर आणि 112 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये सर्व प्रकारच्या ड्रायव्हिंग परिस्थितीत चांगली परफॉर्मन्स देण्याची क्षमता आहे. हे इंजिन 14 टक्के अधिक मायलेज देखील देईल. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार मॅन्युअल गिअरबॉक्सवर 24.8kmpl आणि AMT वर 25.75 kmpl चे मायलेज देते. नवीन स्विफ्टचे सर्व प्रकार 6 एअरबॅग्ज, 3 पॉइंट सीट बेल्ट, हिल होल्ड कंट्रोल, ESC, EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम सारख्या फीचर्सने सुसज्ज आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com