Ola आणि Ather च्या विक्रीत तब्बल 76 टक्क्यांनी घट, काय आहे कारण?

EV Sales April 2024: मार्च महिना इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटसाठी चांगला ठरला आहे. या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची चांगली विक्री झाली आहे. मात्र काही इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांसाठी एप्रिल महिना अत्यंत वाईट गेला आहे.
Ola And Ather
Ola And AtherSaam Tv

Ola And Ather EV:

मार्च महिना इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटसाठी चांगला ठरला आहे. या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची चांगली विक्री झाली आहे. मात्र काही इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांसाठी एप्रिल महिना अत्यंत वाईट गेला आहे. या महिन्यात विक्रीत 76 टक्क्यांपर्यंत पर्यंत मोठी घट झाली आहे.

यामध्ये फक्त ओला किंवा एथरच नाही तर इतर अनेक मोठ्या दुचाकी कंपन्यांच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. या घसरणीमागे FAME-2 सबसिडी रद्द करण्याचा मोठा परिणाम दिसून येतो. या महिन्यात कोणत्या कंपनीचे किती नुकसान झाले आहे, हे जाणून घेऊ...

Ola And Ather
24.8kmpl मायलेज, 6 एअरबॅग्ज; नव्या दमात नवीन Maruti Swift लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Ola आणि Ather ची अवस्था वाईट

News 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिकच्या 33,963 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री झाली होती. तर मार्च महिन्यात कंपनीने 53,320 स्कूटर विकल्या होत्या. अशातच कंपनीला या महिन्यात 36.30 टक्के तोटा सहन करावा लागला आहे.

अथेरचेही मोठे नुकसान झाले आहे. या वर्षी मार्चमध्ये कंपनीने 17,232 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली होती. तर गेल्या महिन्यात कंपनी फक्त 4,062 युनिट्स विकू शकली होती. म्हणजेच यावेळी एथरच्या विक्रीत 76.43 टक्के घट झाली आहे.

Ola And Ather
TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

याशिवाय अँपिअरच्या विक्रीतही 16.52 टक्के घट झाली आहे, गेल्या महिन्यात कंपनीने 2511 युनिट्सची विक्री केली होती. तर मार्चमध्ये 3008 युनिट्सची विक्री करण्यात कंपनीला यश आले आहे. इतर इलेक्ट्रिक कंपन्यांनी गेल्या महिन्यात 9,639 युनिट्सची विक्री केली होती. तर या वर्षी मार्च महिन्यात 18,547 युनिट्सची विक्री झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com