Union Budget 2025 : केंद्र सरकारने भाडेकरूना मोठा दिलासा दिला आहे. नव्या अर्थसंकल्पानुसार, आता ६ लाख रुपयांपर्यंत भाड्याने राहणाऱ्या नागरिकांचा टीडीएस कापला जाणार नाही. आतापर्यंत याची वार्षिक मर्यादा २.४ लाख रुपये इतकी होती. सरकारच्या या घोषणेमुळे भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूंना दिलासा मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या नव्या निर्णयामुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही फायदा होणार आहे. TDS मधून सूट मिळवण्यासाठीची वार्षिक मर्यादा २.४ लाख रुपये इतकी होती. गेल्या काही वर्षांमध्ये घरभाड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तेव्हा TDS मधून सूट वाढवण्यात यावी अशी मागणी सुरु होती.
जर एखादी व्यक्ती अशा घरात राहत असेल, ज्याचे वार्षिक भाडे २.४ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीला TDS कापून घरमालकाला भाडे द्यावे लागते. आता वार्षिक भाड्यावर सूट मिळाल्याने ६ लाख रुपयांपर्यंत वार्षिक भाडे भरणाऱ्या भाडेकरूला TDS कापण्याची गरज नाही. यामुळे भाडेकरूना फायदा होणार आहे.
मध्यमवर्गीयांचा फायदा व्हावा या हिशोबाने सरकारने इनकम टॅक्सशी निगडीत नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 'सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक संसदेत मांडणार आहे. त्यात मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यावरही भर देण्याचा प्रयत्न असेल' अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.