Budget 2025 Memes : सोशल मीडियावर मीम्सचा महापूर, हसत हसत नोकरदार वर्गानं व्यक्त केलं दु:ख; पाहा भन्नाट मीम्स

Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर केला. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक मीम्स पोस्ट झाले. सध्या सोशल मीडियावर अर्थसंकल्प ट्रेंडमध्ये आहे.
Budget 2025 memes
Budget 2025 memesSaam Tv
Published On

Budget Memes : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प २०२५ सादर केला आहे. त्यांनी बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. त्यासोबत नव्या कर प्रणालीनुसार कोणत्या उत्पन्न गटाला किती कर द्यावा लागणार आहे याचीही माहिती दिली. सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आल्याचे पाहायला मिळाले.

नव्या कर प्रणालीनुसार, किती उत्पन्न असणाऱ्यांना किती टक्के कर द्यावा लागणार?

०-४ लाख - ० टक्के

४-८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - ५ टक्के

८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर- १० टक्के

१२ ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - १५ टक्के

१६ ते २० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - २० टक्के

२० ते २४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर - २५ टक्के

२४ लाखांच्या वरील उत्पन्नावर - ३० टक्के

Budget 2025 memes
Budget 2025 : मोबाईल, टीव्ही, कपडे, औषधं... काय-काय स्वस्त होणार? वाचा

अर्थसंकल्प २०२५ मध्ये बिहारसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. बिहारमध्ये विद्यमान आयआयटीचा विस्तार केला जाणार आहे. तसेच तेथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ बांधले जाणार आहे. मिथिला कोसी कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याशिवाय मखाना बोर्ड स्थापन केला जाणार आहे. या सर्व घोषणांमुळे यंदाचा अर्थसंकल्प हा बिहारवर केंद्रीत असल्याची चर्चा होत आहे. यावरुन सोशल मीडियावर अनेक मीम्स पोस्ट होत आहेत.

budget meme
budget memex
budget meme 2
budget meme 2x
Budget 2025 memes
Union Budget 2025 : १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; काय आहे तज्ज्ञांचं मत, पाहा Video

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार आहे. या घोषणेवरुनही सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

पुढच्या आठवड्यात निर्मला सीतारामण नवीन आयकर विधेयक मांडणार आहेत. संसदेत आज अर्थसंकल्प सादर केला. संसदेमध्ये अर्थसंकल्प २०२५ सादर करताना त्यांनी आयकर विधेयकाबाबत घोषणा दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com