Tesseract Scooter Saam tv
बिझनेस

Tesseract स्कूटरचा मार्केटमध्ये जलवा; बुकिंग फूल, काय आहेत बाईकचे फीचर्स आणि किंमत

Tesseract ही स्कूटर फ्युचरिस्टिक मशीन म्हणून ओळखली जात आहे, कारण या स्कूटरमध्ये खूप सारे फीचर्स देण्यात आली आहेत. Ultraviolette कंपनीने बनवलेली नवीन ई-स्कूटर Tesseract मार्च २०२५ मध्ये लॉन्च झाली होती.

Bharat Jadhav

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय. ओला, एथर सारख्या कंपन्यांनी आधीच आपले उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यामुळे लोकांना ईव्हीमध्ये अनेक पर्याय मिळत आहेत. याच ट्रेंडमध्ये आता Ultraviolette Automotive ने नवीन बाईक सादर केलीय. Tesseract नावाच्या स्कूटरनं बाजारात कल्लोळ माजवलाय. बाईकचे फीचर्स आणि किमतीमुळे ही स्कूटर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. स्कूटर लॉन्च होताच ७० हजार पेक्षा जास्त बाईकची बुकिंग झाल्या.

Ultraviolette Tesseract ची काय आहे किंमत

Ultraviolette Tesseract स्कूटरची किमत १.२० लाख रुपये आहे. जर तुम्ही ही ई-स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अवघे ५०००० रुपये देऊन बुकिंग करू शकतात. दरम्यान, बुकिंगचा वाढता ट्रेंड पाहून, स्कूटरची किंमत ₹१.४५ लाखांवर पोहोचली. ही किंमत त्याच्या बेस व्हर्जनसाठी (३.५kWh बॅटरी) आहे. त्याचवेळी, ५ kWh आणि ६kWh बॅटरी असलेले व्हेरिएंट वर्षाच्या अखेरीस लॉन्च केले जाणार आहेत.

अनेक अपडेटेड फीचर्स

या स्कूटरला फ्युचरिस्टिक मशीन म्हटले जात आहे, कारण यात अनेक अपडेटेड फीचर्स आहेत. जसे की ऑनबोर्ड नेव्हिगेशन, वायरलेस चार्जिंग, रडार सिस्टम, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, स्मार्ट डॅशकॅम, ड्युअल-चॅनेल ABS, हिल होल्ड असिस्ट आणि मल्टी-लेव्हल ट्रॅक्शन आणि ब्रेकिंग कंट्रोल. या सर्व फीचर्समुळे ही स्कूटर इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये खूप खास बनते.

Tesseract चा टॉप-स्पीड 125 किमी

टेसरॅक्टचा (Tesseract) स्कूटरचा टॉप स्पीड १२५ किमी प्रतितास आहे. जो त्याच्या हाय-स्पेक व्हेरिएंटचा असू शकतो. एंट्री-लेव्हल व्हर्जन थोडे कमी पॉवरफुल असू शकतात, परंतु तरीही ही स्कूटर सामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.

कंपनी २०२६ च्या पहिल्या तिमाहीपासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू करू शकते. त्याच वेळी, इतर प्रकारांची माहिती २०२५ च्या अखेरीस उघड केली जाईल. परंतु या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगनुसार,Ola, Ather आणि TVS कंपन्यांना मोठी स्पर्धा निर्माण होईल असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT