
मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स दीड टक्क्यांहून अधिक वाढला. आज शुक्रवारी सेन्सेक्स १०४६.३० अंकांच्या वाढीसह ८२,४०८.१७ वर बंद झाला. दरम्यान, बाजाराच्या वेळेत दलाल स्ट्रीटमध्येही ११,०० अंकांची वाढ झाली. गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात सुमारे ५ लाख कोटी रुपये गुंतवले. बाजारात अचानक वाढ होण्याचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया.
सेन्सेक्स ८१,३६१.८७ च्या मागील बंदच्या तुलनेत ८१,३५४.८५ अंकावर सुरु झाला, आणि १,१३३ अंकांनी किंवा १.४ टक्क्यांनी वाढून ८२,४९४.४९ च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी ५० त्याच्या मागील बंदच्या २४,७९३.२५ च्या तुलनेत २४,७८७.६५ अंकावर सुरु झाला, आणि १.४ टक्क्यांनी वाढून २५,१३६.२० च्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला.
त्याचप्राणे, बाजार बंद होताना, सेन्सेक्स १,०४६ अंकांनी किंवा १.२९ टक्क्यांनी वाढून ८२,४०८.१७ अंकावर बंद झाला. तर निफ्टी ३१९ अंकांनी किंवा १.२९ टक्क्यांनी वाढून २५,११२.४० अंकावर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२० टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५५ टक्के वाढला. यासोबतच, बीएसईच्या एकूण मार्केट कॅपमध्येही वाढ झाली. गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात एकूण ४७३,६१६.५१ कोटी रुपये कमावले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.