टीव्हीएसने भारतात नवी इलेक्ट्रिक स्कूटर ऑर्बिटर ९९,९९० रुपयांना लाँच केली.
यात ३.१kWh बॅटरी असून एका चार्जवर १५८ किमी रेंज मिळते.
स्कूटरमध्ये स्मार्ट LCD कन्सोल, क्रूझ कंट्रोल आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.
मोठ्या स्टोरेज स्पेस आणि ३ वर्षे/५०,००० किमी वॉरंटीसह ऑर्बिटर आकर्षक ठरते.
टीव्हीएस मोटर कंपनीने भारतीय बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर ऑर्बिटर सादर केली आहे. आयक्यूब रेंज आणि टीव्हीएस एक्स नंतर कंपनीची ही तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ऑर्बिटरची किंमत ९९,९९० रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली असून ती सात प्रीमियम रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तिच्या डिझाइनमध्ये आधुनिकता आणि भविष्यकालीन स्टाईलचा संगम दिसतो. मोठा एलईडी हेडलाइट, डीआरएल स्ट्रिप, बॉक्सी बॉडी पॅनेल, लांब व्हिझर आणि सपाट सीट यामुळे ती बाजारातील इतर स्कूटर्सपेक्षा वेगळी ठरते.
ही स्कूटर निऑन सनबर्स्ट, स्ट्रॅटस ब्लू, लूनर ग्रे, मार्टियन कॉपर, कॉस्मिक टायटॅनियम आणि स्टेलर सिल्व्हर अशा सहा आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. शक्तीशाली 3.1kWh बॅटरी आणि 2.1kW हब-माउंटेड मोटरसह येणाऱ्या ऑर्बिटरला IP-67 रेटिंग मिळाले आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर एका चार्जवर 158 किमी पर्यंत चालू शकते. तिचा टॉप स्पीड 68 किमी प्रतितास असून 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी केवळ 6.8 सेकंद लागतात. तुलनेत, बेस iQube 2.2kWh मॉडेलपेक्षा ऑर्बिटरची रेंज तब्बल 64 किमी जास्त आहे. यामध्ये इको आणि सिटी असे दोन राइड मोड दिले गेले आहेत.
वैशिष्ट्यांमध्येही टीव्हीएसने कोणतीही तडजोड केलेली नाही. ऑर्बिटरमध्ये ५.५ इंचाचा रंगीत एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, एसएमएस/कॉल अलर्ट आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसारख्या सुविधा देतो. स्कूटरमध्ये एलईडी लाईट्स, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, ऑटो हिल-होल्ड असिस्ट, जिओ फेन्सिंग, टो अलर्ट, क्रॅश/फॉल अलर्ट आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट अशा प्रगत सुविधा उपलब्ध आहेत.
स्टोरेजची सोयही या स्कूटरची खासियत आहे. ३४ लिटरचे मोठे अंडरसीट स्टोरेज दोन हाफ-फेस हेल्मेटसाठी पुरेसे आहे, तर समोर एक लहान स्टोरेज कंपार्टमेंट आणि लांब २९० मिमी फूटबोर्ड दिलेला आहे. कंपनीने या स्कूटरसाठी ३ वर्षे किंवा ५०,००० किमीपर्यंत वॉरंटी देण्याची हमी दिली आहे. ऑर्बिटरमुळे भारतीय ग्राहकांना किफायतशीर किंमतीत स्टायलिश, तंत्रज्ञानसंपन्न आणि दमदार परफॉर्मन्स देणारा इलेक्ट्रिक पर्याय मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.