Car Care Tips: गाडी चालवताना 'या' ४ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास सस्पेंशन होईल खराब, जाणून घ्या

Suspension Care : गाडीचे सस्पेंशन टिकवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. खराब रस्ते, अचानक ब्रेक, जड भार किंवा अॅक्सेसरीज यामुळे त्यावर ताण येतो. योग्य सवयींमुळे सस्पेंशन अधिक काळ चांगल्या स्थितीत राहते.
AVOID THESE 4 DRIVING MISTAKES THAT DAMAGE CAR SUSPENSION
AVOID THESE 4 DRIVING MISTAKES THAT DAMAGE CAR SUSPENSION
Published On
Summary
  • गाडीचे सस्पेंशन खराब होण्यामागे चुकीच्या ड्रायव्हिंग सवयी जबाबदार असतात.

  • खड्ड्यांवर वेगाने गाडी नेणे व जास्त वजन घेणे टाळावे.

  • वेळेवर गाडी सर्व्हिस करून सस्पेंशन तपासावे.

  • योग्य ड्रायव्हिंगने सस्पेंशनचे आयुष्य वाढवता येते.

प्रवास करताना गाडीला चांगले तसेच खराब रस्ते अनुभवावे लागतात आणि याचा सर्वाधिक परिणाम सस्पेंशनवर होतो. उत्तम रस्त्यांवर गाडी चालवल्यास सस्पेंशनला नुकसान होत नाही, मात्र खड्डेमय आणि तुटक्या रस्त्यांवरून गाडी गेल्यास त्यावर मोठा ताण येतो. अचानक ब्रेक मारणे, जास्त वजन वाहून नेणे किंवा गाडीत जड अॅक्सेसरीज बसवणे यामुळेही सस्पेंशन कमकुवत होते. योग्य सवयी अंगीकारल्यास सस्पेंशनचे आयुष्य वाढते. त्यामुळे गाडी चालवताना या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून वाहन दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहील.

खराब रस्त्यांवर गाडी चालवू नका

जर तुम्हाला गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी खराब रस्त्यांचा अंदाज आधीच असेल, तर शक्य असल्यास पर्यायी मार्ग निवडणे श्रेयस्कर ठरते. कारण अशा रस्त्यांवरून गाडी चालवल्याने सस्पेंशनवर अतिरिक्त दबाव येतो आणि त्याच्या लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, खडबडीत रस्ते अंडरबॉडीलाही मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतात. योग्य रस्ता निवडल्यास गाडी सुरक्षित राहते आणि दुरुस्तीच्या खर्चापासून बचाव करता येतो.

ओव्हरलोडिंग टाळा

कार कंपन्या प्रत्येक वाहनाचे सस्पेंशन त्याच्या ठराविक क्षमतेनुसार तयार करतात. जर गाडीमध्ये जास्त वजन ठेवले गेले, तर सस्पेंशनवर ताण येतो आणि ते खराब होऊ शकते. एकदा सस्पेंशन बिघडले की, गाडी सामान्य रस्त्यांवरसुद्धा सहज चालत नाही. त्यामुळे गाडीमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त सामान न ठेवणे अधिक सुरक्षित ठरते आणि दुरुस्तीचा खर्चही वाचतो.

Emergency ब्रेक लावण्याची सवय बदला

अनेक लोक गाडी चालवताना अचानक Emergency ब्रेक लावण्याची सवय लावून घेतात, पण ही सवय धोकादायक ठरू शकते. जोरात ब्रेक लावल्याने गाडीचे वजन पुढील सस्पेंशनवर येते, ज्यामुळे त्यावर जास्त ताण पडतो. वारंवार असे घडल्यास सस्पेंशन हळूहळू कमजोर होऊन खराब होते. त्यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ब्रेक हलके आणि नियंत्रित पद्धतीने लावावेत.

जड अॅक्सेसरीज टाळा

गाडीला आकर्षक लूक देण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी अनेकजण जड अॅक्सेसरीज बसवतात. पण या वस्तूंमुळे गाडीचे वजन वाढते आणि सस्पेंशनवर अतिरिक्त भार पडतो. सततच्या ताणामुळे सस्पेंशन कमजोर होऊ लागते आणि कालांतराने ते खराब होऊ शकते. त्यामुळे अॅक्सेसरीज निवडताना हलक्या व योग्य वस्तूंना प्राधान्य देणे अधिक फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com