Tur Dal Price Update saam tv
बिझनेस

Tur Dal Price Hike : महागाईचा चटका काही सोसवेना! सणासुदीत तूरडाळीचे भाव गगनाला

Tur Dal Price Increase : ऐन सणासुदीत तूरडाळ महागली आहे. त्यामुळे गृहिणींना पुन्हा एकदा महागाईचा चटका सोसावा लागणार आहे.

कोमल दामुद्रे

Tur Dal Rate : महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक दणका मिळाला आहे. मागील काही महिन्यापासून टोमॅटो व इतर भाज्यांच्या दरात सतत वाढ होताना पाहायला मिळाली. अशातच ऐन सणासुदीत तूरडाळ महागली आहे. त्यामुळे गृहिणींना पुन्हा एकदा महागाईचा चटका सोसावा लागणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ सध्या प्रतिकिलो १६० ते १७० रुपयांवर आली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर व मूग डाळीच्या भावातही मागील दोन महिन्यांत सरासरी २० रुपयांनी वाढ झाली. अशातच या डाळींच्या दरातील तेजी वर्षभर अशी राहील अशी माहिती समोर येत आहे.

अवकाळी पाऊस व कडाक्याच्या उन्हामुळे डाळींच्या उत्पादनाला अधिक फटका बसला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींची आवक कमी होत असून दरात (Price) वाढ होत आहे. सध्या किरकोळ बाजारात डाळींचे दर ३० ते ३५ टक्के तर कडधान्यांचे दर २० ते २२ टक्क्यांनी कडाडले आहे.

जागतिक बाजारातील (Market) कडधान्यांच्या वाढत्या दरामुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील दोन महिन्यात तूरडाळ १०० ते ११० रुपयांवरुन १६० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हरभरा डाळ ५७ ते ५८ रुपयांवरुन ७० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून शेतकरी विक्री करत असलेल्या तुरडाळीला मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सरासरी १०,००० ते १३,००० रुपये (Price) दर मिळाला. येत्या काळात तूरडाळीच्या दरात घट होण्याची शक्यता कमी प्रमाणात वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : घरी बीपी मोजता? हाताची ही एक चूक देऊ शकते चुकीचे रीडिंग

लक्ष्मीपूजनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि वस्तूंची यादी

जेवल्यानंतर ढेकर का येतात?

Weather Update: ७ राज्यांत धुव्वाधार पावसाची शक्यता, ५० किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

Firecracker Blast: फटाके फोडताना अनर्थ घडला! मुलानं गमावली हाताची चार बोटं

SCROLL FOR NEXT