Rules Change In 1st September : सप्टेंबर महिन्यात 2000च्या नोटेसह अनेक नियमांमध्ये होणार बदल, वाचा सविस्तर

Rules Changes From 1st September : १ सप्टेंबर २०२३ पासून देशात अनेक नियमात बदल होणार आहे.
Rules Changes From 1st September
Rules Changes From 1st SeptemberSaam Tv
Published On

Financial Deadlines From 1st September:

लवकरच ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिना सुरु होईल. या महिन्यात आपल्या अनेकांचे बरेचसे प्लान असतात. पण त्याही व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी आर्थिक बजेट कोलमडले जाण्याची भीती अनेकांना असते.

त्याचप्रमाणे १ सप्टेंबर २०२३ पासून देशात अनेक नियमात बदल होणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. जाणून घेऊया या कोणत्या गोष्टीत बदल होणार आहेत ते.

Rules Changes From 1st September
Ola Uber: ओला-उबर चालकांना हायकोर्टाचा दणका, राईड रद्द केल्यास प्रवाशांच्या खात्यात जमा होणार पैसे

1. अॅक्सिस मॅग्नस क्रेडिट कार्ड

देशात सध्या असलेल्या खाजगी बँका (Bank) अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना मॅग्नस क्रेडिट कार्ड सुविधा देत आहे. अॅक्सिस बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे की 1 सप्टेंबरपासून मॅग्नस क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क माफची सुविधा दिली जाणार नाही. 15,000 रुपयांच्या मासिक खर्चावर ग्राहकांना 200 रुपयांचे 12 EDGE रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. तर नवीन कार्डधारकांसाठी वार्षिक शुल्क 12,500 रुपये + GST ​​असेल. याशिवाय ज्या ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड आहे त्यांना 10,000 रुपये वार्षिक शुल्क + GST ​​भरावा लागेल.

2. आधार कार्ड (Aadhar card) अपडेट

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ( UIDAI ) ने आधार वापरकर्त्यांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत दिली आहे. यामध्ये कोणताही आधारधारक आपले कागदपत्र मोफत अपडेट करू शकतो. ही सुविधा फक्त 14 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध आहे. UIDAI ने आधार वापरकर्त्यांना आवाहन केले आहे की जर त्यांनी 10 वर्षांपासून आधार कार्ड अपडेट केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आधार अपडेट करावे.

Rules Changes From 1st September
Gold Silver Price (29th August) : सणासुदीत सोन्याचा भाव गगनाला, चांदीच्या दरातही उसळी; जाणून घ्या आजचा भाव

3. 2,000 रुपयांची नोट बदलली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जमा करण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली होती. मध्यवर्ती बँकेने मे महिन्यात 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने 30 सप्टेंबर 2023 ची मुदत दिली आहे. जर तुम्ही अजून 2,000 रुपयांची नोट बदलली नसेल, तर ती लगेच बदलून घ्या

4. पॅन-आधार लिंक

जर एखाद्या नागरिकाने त्याचे पॅन-आधार लिंक केले नाही तर 1 ऑक्टोबर 2023 रोजी त्याचे पॅन कार्ड निलंबित केले जाईल. याचा अर्थ असा की तुम्ही कागदपत्र म्हणून पॅन कार्ड वापरू शकणार नाही. याशिवाय, जर तुमचा पॅन आधारशी लिंक नसेल, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या डीमॅट खात्यावरही होईल.

Rules Changes From 1st September
Bank Holidays In September 2023: सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या दिवशी आणि काय आहेत कारणे?

5. डिमॅट खाते नोंदणी

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांना नोंदणी किंवा निवड रद्द करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. आता त्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 आहे.

6. SBI WeCare

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या विशेष ज्येष्ठ नागरिक FD ची अंतिम मुदत देखील 30 सप्टेंबर 2023 आहे. या एफडीचे नाव एसबीआय वी-केअर आहे. या एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजाचा लाभ मिळतो. बँक या एफडीवर ७.५०% व्याज देते.

7. IDBI अमृत महोत्सव FD

IDBI बँकेने विशेष FD लाँच केली आहे. अमृत ​​महोत्सव एफडी असे या एफडीचे नाव आहे. ही एफडी 375 जिन्ससाठी आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळते. त्याचप्रमाणे, 444 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7.15 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याजदर मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com