Bank Holidays In September 2023: सप्टेंबरमध्ये १६ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या दिवशी आणि काय आहेत कारणे?

Bank Holidays 2023 : देशभरातील बँका सप्टेंबर महिन्यात एकूण १६ दिवस बंद राहणार आहेत.
Bank Holidays
Bank HolidaysSaam Tv
Published On

Bank Holidays In September 2023 List

देशभरातील बँका सप्टेंबर महिन्यात एकूण १६ दिवस बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळं बँका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात एकूण १६ दिवस सुट्ट्या आहेत.

आजकाल प्रत्येक गोष्टी या ऑनलाईन होतात. यात बँकाच्या कामांचाही समावेश असतो. बँकाची कामे ही ऑनलाईन जरी होत असली तरी काही महत्त्वाच्या कामांसाठी तुम्हाला बँकेत जावेच लागते. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांची ही यादी नक्की पाहा.

Bank Holidays
Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: फक्त 20 रुपयांत मिळवा 2 लाखांचा फायदा; या सरकारी योजनेसाठी असा करा अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यात पुढील महिन्यातील प्रादेशिक सुट्ट्या, शनिवार, रविवारचा समावेश आहे. रविवारच्या एकूण ४ सुट्ट्या असतात. त्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. त्यामुळे या ६ सुट्ट्या निश्चित असणार आहेत. त्यात अजून काही दिवस बँका बंद राहणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात बँकाच्या सुट्ट्यांची यादी

६ सप्टेंबर, बुधवार - श्री कृष्ण जन्माष्टमी

७ सप्टेंबर, गुरुवार - जन्माष्टमी (श्रावण वद-8) / श्री कृष्ण अष्टमी

८ सप्टेंबर, सोमवार - वर्षसिद्धी विनायक व्रत / विनायक चतुर्थी

१९ सप्टेंबर, मंगळवार - गणेश चतुर्थी / संवत्सरी (चतुर्थी पक्ष)

२० सप्टेंबर, बुधवार - गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुखाई

Bank Holidays
Moon Effects On Health : चंद्रामुळे आरोग्याला कसे फायदे होतात? संशोधनानुसार समोर आली महत्वाची माहिती

२२ सप्टेंबर, शुक्रवार - श्री नारायण गुरु समाधी दिन

२३ सप्टेंबर, शनिवार - महाराजा हरिसिंह जी यांचा जन्मदिन,

२५ सप्टेंबर, सोमवार - श्रीमंता शंकरदेव यांची जयंती,

२७ सप्टेंबर, बुधवार - मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)

२८ सप्टेंबर गुरुवार - ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी - (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिन) (बारा वफत)

२९ सप्टेंबर शुक्रवार- -उल-नबी नंतर ईद-ए-मिलाद इंद्रजात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com