TRAI  Saam Tv
बिझनेस

एअरटेल-जिओची पिळवणूक संपणार, आता फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज येणार, TRAI चे निर्देश

TRAI Rule: महागड्या रिचार्जला आळा घालण्यासाठी ट्रायने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता फक्त मेसेज आणि कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान ठेवणे हे बंधनकारक आहे.

Siddhi Hande

सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्याच्या जगात सर्वांकडेच मोबाईल हा असतो. मोबाईल ही काळाची गरज आहे. मोबाईलमुळे आपण एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती मिळवू शकता. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. नवीन वर्ष सुरु होण्याआधीच स्मार्टफोन युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. दूरसंचार नियामक म्हणजेच ट्रायने काही नियमांमध्ये बदल केले आहे. (TRAI New Rule)

आता ट्रायने रिचार्ज शुल्कांमध्ये बदल केला आहे. यामध्ये आता मोबाईलवर फक्त टॉक आणि एसएमएस सुविधा दिली जाणार आहे. ज्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा वापर होत नाही, अशा ग्राहकांसाठी व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र प्लान असणे बंधनकारक आहे. तसेच ट्रायने विशेष रिचार्जवरील ९० दिवसांची मर्यादा काढून ३६५ दिवस केली आहे. (TRAI Rule For Telecom Company )

सध्या रिचार्ज प्लान हे खूप महाग आहेत. त्यामुळे महागड्या रिचार्जची लूट रोखण्यासाठी ट्रायने कॉलिंग आणि मेसेजसाठी खास रिचार्ज प्लान तयार करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. यामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या कंपन्यांना समावेश आहे. या नवीन रिचार्ज प्लानमध्ये डेटाशिवाय फक्त मेसेज आणि कॉल करता येणार आहे.

आजकाल अनेकजण वायफाय वापरतात. त्यामुळे अनेकांना डेटाची गरज नसते. तसेच ग्रामीण भागात अनेकांकडे स्मार्टफोन नाही आहेत. त्यामुळे कॉल आणि मेसेजचा वापर जास्त होतो. परंतु त्यांना नाइलाजाने डेटा आणि कॉलिंग असलेला रिचार्ज करावा लागतो. त्यामुळेच दूरसंचार कंपन्यांनी डेटाशिवाय कॉलिंग आणि मेसेजची सेवा सुरु ठेवावी, अशी मागणी केली जात होती.

यामुळेच ट्रायने मोठा निर्णय घेतला आहे. ट्रायने आता सर्व टेलिकॉम कंपन्यांना फक्त मेसेज आणि कॉलिंगसाठी रिचार्ज प्लान सुरु ठेवणे बंधनकारक केले आहे. यामुळे देशातील १५० दशलक्ष युजर्सला फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT