Toyota Urban Cruiser Hyryder Price Hike Saam Tv
बिझनेस

Toyota ची ही SUV महागली, कंपनीने किंमतीत तब्बल इतक्या हजारांची केली वाढ

Satish Kengar

Toyota Urban Cruiser Hyryder Price Hike:

टोयोटाने आपल्या पॉवरफुल SUV Urban Cruiser Hyryder च्या किमती 28,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. आता तुम्हाला या कारचे बेस मॉडेल 11.14 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये मिळेल. कारच्या CNG प्रकारांच्या S E-CNG आणि G E-CNG च्या किमती 15,000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.

बाजारात ही कार Hyundai Creta, Kia Seltos, MG Astor आणि Volkswagen Taigun सारख्या कारशी स्पर्धा करते. ही मिड सेगमेंटची हायब्रीड कार आहे आणि ती 11 रंगांच्या पर्यायांमध्ये येते. कंपनी कारमध्ये 1462 cc आणि 1490 cc इंजिन देते. ही एक ऑल व्हील ड्राइव्ह कार आहे. ही कार तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये येते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाच सीटर कारमध्ये सहा एअरबॅग्ज

Toyota Urban Cruiser Hyryder मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन ट्रान्समिशनसह येते. याच्या वेगवेगळे प्रकार 20.58 ते 27.97 kmpl पर्यंत मायलेज देतात. ही हायब्रिड कार 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येते. याच्या पुढील ड्रायव्हर केबिन आणि मागील भागात एकूण सहा एअरबॅग्ज उपलब्ध आहेत. ही पाच सीटर कार आहे, ज्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे. ही एक हाय स्पीड कार आहे, जी 180 किमी प्रतितासचा टॉप स्पीड देते.  (Latest Marathi News)

कारमध्ये सनरूफ आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्स

टोयोटाच्या या पॉवरफुल कारचे टॉप मॉडेल 20.19 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये अॅम्बियंट लाइटिंग मिळते आणि यात अलॉय व्हील्स आहेत. कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल होल्ड असिस्ट सिस्टम आहे.

हिल होल्ड असिस्टमुळे टेकड्यांवर गाडी चालवणे सोपे होते. ही सेन्सर-ऑपरेटेड सिस्टीम कारला उंचीवर मागे सरकण्यापासून रोखण्यास मदत करते. कारमध्ये हेडअप डिस्प्ले आणि एलईडी टेललाइट आहे. कारमध्ये सनरूफचाही पर्याय आहे. ही कार 91 bhp चा हाय पॉवर आणि पेट्रोलवर 122 Nm टॉर्क जनरेट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT