Toll Tax Rule Saam tv
बिझनेस

Toll Tax Rule: वाहनचालकांना दिलासा! 'या' एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बंद, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Toll Tax Rule Change: केंद्र सरकारने टोलच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता अर्धवट काम झालेल्या एक्सप्रेस वेवर अतिरिक्त टोल आकारला जाणार नाही. जेवढे काम पूर्ण त्या भागापुरताच टोल आकारला जाणार आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारचा वाहनधारकांना दिलासा

आता या एक्सप्रेस वेवर टोल आकारणार नाही

नवीन नियमात काय म्हटलंय?

केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अर्धवट काम झालेल्या किंवा पूर्ण सुरु न झालेल्या एक्सप्रेस वेवर जास्तीचा टोल वसूल केला जाणार नाहीये. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. सरकारने टोल नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

आजही अनेक एक्सप्रेस वेवर कामे अर्धवट आहेत. काही कामे सुरु आहेत. यामुळे प्रवाशांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. असं असली तरीही त्यांना पूर्ण टोल भरावा लागतो. आता या नियमात बदल करण्यात आला आहे.

याआधीच्या नियमानुसार, जर एक्सप्रेस वेचे काम पूर्ण झाले नसले तरी एक्सप्रेस वेप्रमाणेच टोल आकारला जात होता. मात्र, आता या नियमात बदल करण्यात आला आहे. आता फक्त तुम्ही सुरु असलेल्या भागापुरता टोल भरणार आहात. जो एक्सप्रेसवे पूर्ण तयार झाला नाही तिथे सुरु असलेल्या भागावरच नॅशनल हायवेच्या दराने टोल आकारला जाईल.अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही.

नॅशनल हायवे फी नियम २००८ मध्ये सुधारणा करण्यात आला आहे. हा नवीन नियम १५ फेब्रुवारीपासून लागू होणार नाही. जोपर्यंत एक्सप्रेस वेचे काम पूर्ण होत नाही किंवा किमान एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सवलतीचे दर असेच लागू राहणार आहेत. यामुळे प्रवाशांचे पैसे आणि वेळ वाचणार आहे.

नवीन नियमानुसार, नॅशनल एक्सप्रेस वे पूर्ण झाल्याशिवाय एक्सप्रेस वेचे दर लागू होणार नाहीत. तोपर्यंत वाहनधारकांना नॅशनल हायवेसारख्याच दराने टोल भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT