Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today : सोन्याला पुन्हा झळाळी, अचानक किंमतीत मोठी वाढ, वाचा 22k, 24k सोन्याचा आजचा भाव

Today’s 22K and 24K gold rate in Mumbai and Pune : आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ झाली. २४ कॅरेट , २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली. मुंबई-पुण्यातही आज दरात वाढ दिसून आली.

Namdeo Kumbhar

  • बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली.

  • २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली.

  • मुंबई, पुणे अन् दिल्लीमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत?

  • काही दिवसांच्या घसरणीनंतर चांदीच्या किंमतीतही किंचित वाढ झाली.

Gold Rate Today, 24k and 22k Gold price Mumbai Pune Latest news : पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली होती, तर मंगळवारी सोन्याच्या किंमतीत कपात दिसून आली होती. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देवणाघेवाण अन् अमेरिकन फेडरल बँकेच्या होणाऱ्या बैठकीमुळे सोन्याच्या दरात चढउतार होत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,०४६ रूपये इतका आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११९६० रूपये नोंदवण्यात आला आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९७८८ रूपयांवर आली आहे.

मागील ३ दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोनं ३०० रूपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत २८० रूपयांनी वाढली आहे. दुसरीकडे चांदीच्या किंमतीत मात्र मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिक फेडरल बँकेच्या बैठकीनंतर व्याजाच्या दरात कपात होण्याचे संकेत आहेत.जर व्याजदर कपात झाले तर बॉन्ड मार्केट कमकुवत होऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या खरेदीकडे लोकांच कल वाढलाय. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्याची चिन्हे आहेत. मुंबई आणि पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा दर १३,०३१ रुपये प्रति ग्रॅम इतका आह. तर २२ कॅरेटचा ११,९४५ रुपये आणि १८ कॅरेटचा ९,७७३ रुपये आहे.

काही दिवसानंतर आज चांदीच्या दरातही किंचत वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अन् खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चांदी आज प्रति ग्राम १९९ रूपयांना विकली जातेय. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. पण आता पुन्हा एकदा चांदीचा दरही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आज सराफा बाजारात चांदीची किंमत प्रति किलो १९९००० रूपये इतकी झाली आहे. मागील दोन वर्षांत चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर काय ?

१ ग्रॅम सोन्याची किंमत १३,०४६ रुपये आहे. मंगळवारच्या तुलनेत ८७ रुपयांनी महागले.

१० ग्रॅम सोन्याची किंमत १,३०,४६० रुपये नोंदवण्यात आली. ८७० रुपयांनी सोनं महागले.

१० तोळं सोन्याची किंमत १३,०४,६०० रुपये आहे. मंगळवारच्या तुलनेत ८,७०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली.

२२ कॅरेट सोन्याची आजची स्थिती काय?

१ ग्रॅम सोन्याची किंमत ११,९६० रुपये नोंदवण्यता आली. ८० रुपयांनी महागले.

१० ग्रॅम सोन्याची किंमत १,१९,६०० रुपये आहे. मंगळवारच्या तुलनेत ८०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

१० तोळं सोन्याची किंमत ११,९६,००० रुपये झाली. ८,००० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

१८ कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

१ ग्रॅमची सोन्याची किंमत ६५ रूपयांनी वाढून ९,७८८ रुपये झाली.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ६५० रूपयांनी वाढून ९७,८८० रूपये झाली.

१०० ग्रॅमसोन्याची किंमत ९,७८,८०० रुपये झाली आहे. यामध्ये ६,५०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस या वाहनांना बंदी; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

Sindhudurg: आईच्या फोनवरून मेसेज, भेटायला बोलावलं; धरणात आढळले प्रेमी युगुलाचे मृतदेह, नेमकं काय घडलं?

SBI Har Ghar Lakhpati Scheme: स्टेट बँकेची हर घर लखपती योजना! महिन्याला फक्त ५९१ रुपये गुंतवून मिळणार लाखो रुपये

Municipal Elections : महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधीचा? महत्त्वाची तारीख आली समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

SCROLL FOR NEXT