Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate : दरवाढीने पुन्हा रेकॉर्ड तोडला, सोनं आणखी महागलं, मुंबई-पुण्यात 24k, 22k, 18k सोन्याची किंमत काय?

today gold rate in Mumbai and Pune : आज सराफा बाजारात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये २४, २२ आणि १८ कॅरेट सोनं महागलं असून प्रति तोळा १२०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

Namdeo Kumbhar

Gold Price Today; Mumbai Pune Delhi 24k, 22k, 18k Rates : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमती दररोज नवा रेकॉर्डवर पोहचत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य चिंतेत आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याला झळाळी मिळत असल्याने ग्राहकांमध्ये निराशाचे वातारण आहेत. आजही सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठलाय. २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये आज प्रतितोळा १२०० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आह. तर प्रति ग्रॅम १२० रूपयांनी सोनं महागलं. १० तोळं सोनं १२००० रूपयांनी वाढलेय. (gold price today per gram and per tola) मुंबई, पुणे, दिल्लीसह देशभरात सोन्याच्या किंमती किती आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात...

आजचे सोन्याचे दर किती आहेत? (Gold Price Today)

देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४,१२२ रुपये इतका झालाय. शुक्रवारच्या तुलनेत प्रतिग्रॅम १२० रूपयांनी वाढ झाली. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११० रूपयांनी वाढून १२,९४५ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १०,५९२ रुपये इतका झालाय. शु्क्रवारच्या तुलनेत यामध्ये ९० रूपयांची वाढ झाली.

प्रति तोळा सोन्याची किंमत किती ?

२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,४१,२२० रुपयांवर पोहचली आहे. प्रतितोळा सोनं तब्बल १२०० रूपयांनी महागले आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक किंमत मानली जात आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११०० रूपयांनी वाढून १,२९,४५० रुपये उच्चांकी पातळीवर पोहचलेय. लग्नसराई अन् अस्थिर जागतिक बाजारामुळे सोन्याच्या किंमती वाढल्याचे बोलले जातेय. पुढील काही दिवस सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलाय.

तुमच्या शहरात सोन्याची किंमत किती आहे ?

चेन्नई - चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१४,१८२ आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१३,००० आहे.

मुंबई, पुणे, जळगाव - महाराष्ट्रात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४,१२२ रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,९४५ रुपये आहे.

दिल्ली - राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४,१३७ रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,९६० रुपये आहे.

बंगळुरू - बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १४,१२२ रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,९४५ रुपये आहे.

हैदराबाद - हैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १४,१२२ रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम १२,९४५ रुपये आहे.

Today Gold Rate: Gold Hits Record High in Mumbai, Pune & Delhi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak Birthday: एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या गिरीजा ओकचं नागपूरशी आहे 'हे' खास नातं

Bhaji Recipe: अवघ्या काही मिनिटांत बनवा चमचमीत भाज्या, या 5 रेसिपी चाटून पुसून खाल

Winter Skin Care : फक्त 'हे' २ प्रोडक्ट्स वापरा अन् स्किन केअर करा, त्वचा कापसासारखी मऊ होईल

Maharashtra Live News Update: गुंड बंडू आंदेकर निवडणुकीचा अर्ज भरण्यास दाखल!

चले तो चाँद तक नही तो...; चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या ८ जवानांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT