Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, उमेदवारीवरून जोरदार हाणामारी, पाहा व्हिडिओ

Chhatrapati Sambhajinagar Corporation : छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाच्या प्रभाग १२ मधील उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद आणि हाणामारी झाली.
Chhatrapati Sambhajinagar News:
Chhatrapati Sambhajinagar CorporationSaam TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये MIM कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलयं. प्रभाग क्रमांक 12 मध्ये एमआयएम पक्षाकडून मोहंमद इसरार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या आनंद रॅलीमध्ये पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. इसरार यांच्या समर्थकांनी रॅली काढली असता, याच प्रभागातून इच्छुक असलेल्या हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली. या वेळी दोन्ही गटांत शा‍ब्दिक वाद आणि हाणामारी झालीये.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक १२ मध्ये एमआयएम पक्षाने मोहंमद इसरार यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या आनंदात काढण्यात आलेल्या रॅलीत पक्षाच्याच दुसऱ्या गटाने हमरीतुमरी केली. या प्रकारामुळे परिसरात काही - काळ तणावाचे वातावरण निर्माण - झाले होते. एमआयएम पक्षाकडून प्रभाग - १२ साठी मोहंमद इसरार यांचे - नाव निश्चित केले. उमेदवारी - मिळाल्याचा आनंद साजरा - करण्यासाठी इसरार यांनी समर्थकांसह किराडपुरा भागात रॅली काढली होती.

Chhatrapati Sambhajinagar News:
Gig Workers : १० मिनिटांची डिलिव्हरी बंद करा! गिग वर्कर्सचा देशव्यापी संप, स्विगी, झोमॅटो अन् झेप्टोवर परिणाम

मात्र, याच प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले हाजी इसाक यांचे समर्थक या निर्णयामुळे संतप्त झाले होते. रॅली किराडपुरा भागात पोहोचताच हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली. या वेळी दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली, ज्याचे रूपांतर पुढे किरकोळ हाणामारीत झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी रॅलीवर हल्ला करत मोहंमद इसरार यांच्या समर्थकांना मारहाण व शिवीगाळ केली. या गोंधळामुळे रॅली अर्ध्यावरच बंद पाडावी लागली.

Chhatrapati Sambhajinagar News:
Election : निवडणूक लढवायची मग ५०० शब्दात निबंध लिहा, अन्यथा..., आयोगाचा नवा नियम काय?

शिवसेना-भाजप जागावाटपचं काय?

संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागावाटपावर चर्चा केली. छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भातली चर्चा अद्यापपर्यंत निर्णयपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर मराठवाड्यातल्या पाच महानगरपालिकेच्या आढावा घेतल्यानंतर रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाठ यांच्यामध्ये युती बाबत चर्चा झाली. १०० टक्के आमचं ठरलय. असं दोन्ही नेत्यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar News:
Election : निवडणूक लढवायची मग ५०० शब्दात निबंध लिहा, अन्यथा..., आयोगाचा नवा नियम काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com