Today's Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today's Gold Rate: सोन्याच्या दरात ८२०० रुपयांची वाढ; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today's Gold Rate 5th August 2025: आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ८२० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. सोन्याच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना मात्र प्रश्न पडला आहे. सोने खरेदी करावे की नाही या संभ्रमात आहेत. सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. परंतु सोन्याचे वाढते दर पाहून खरेदी करण्याकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे.

सोन्याचे दर १ लाखांच्या पार गेले आहेत. त्यावर जीएसटी लागू झाल्यावर हे दर अजून वाढतात. आज १ तोळा सोन्यामागे ८२० रुपयांनी वाढ झाली आहे.

आजचे सोन्याचे दर (Todays Gold Rate)

आज २५४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ८२० रुपयांची वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर १,०२,२२० रुपये आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ६५६ रुपयांची वाढ झाली असून हे दर ८१,७७६ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १०,२२,२०० रुपये आहेत. १० तोळा सोन्याच्या दरात ८२०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. या दरात ७५० रुपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९३,७०० रुपये आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७४,९६० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,३७,००० रुपये आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ६२० रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ७६,६७० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६१,३३६ रुपये आहेत. १० तोळ्याचे दर ७,६६,७०० रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरात फार काही बदल झालेला नाही. ८ ग्रॅम चांदीची किंमत ९२० रुपये आहे.१० ग्रॅम चांदीचे दर १,१५० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,५०० रुपये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Gang : कुख्यात लॉरेन्सचा खेळ खल्लास? बिष्णोई गँग दहशतवादी म्हणून घोषित; कुणी केला घोषणा?

Devendra Fadnavis: हिंसाचारामागील आरोपीला शोधून काढू, कडक कारवाई करू; CM फडणवीसांचा इशारा|VIDEO

IND Vs Pak : भारतीय राष्ट्रगीताचा पाकिस्तानी खेळाडूंकडून अपमान, राष्ट्रगीत सुरु असताना रौफ-आफ्रिदीनं नको ते केलं, पाहा Video

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रावळपाडा पुलाखाली प्रचंड वाहतूक कोंडी

Teeth Whitening: दात पिवळे पडलेत? तर त्वरीत पांढरे करण्यासाठी करा 'हे' प्रभावी घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT