केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना खूप लोकप्रिय आहे. देशातील सर्वाधिक लोक शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. या योजनेत तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणार आहे.
पीएम किसान योजनेत (PM Kisan Sanman Nidhi Yojana)आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेत पुढचा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात येणार आहे. याबाबक कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली आहे. या योजनेत १३ कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ (These Farmer Will Not Get Benefit)
पीएम किसान सन्मान निधी योजनेत जर बनावट पद्धतीने लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झाली नसेल त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.
केवायसी कसं करायचं? (KYC Process For PM Kisan Sanman Nidhi)
सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.
त्यानंतर होमपेजवर असलेल्या ई-केवायसीवर क्लिक करा.
यानंतर आधार नंबर टाकून सर्चवर क्लिक करा.
यानंतर मोबाईल नंहर टाका. त्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
ओटीपी टाका. त्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.