
प्रत्येकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात.पोस्ट ऑफिस, बँकेच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात चांगले पैसे मिळतील. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला दररोज फक्त ३३३ रुपये जमा करायचे आहेत आणि १७ लाख रुपये मिळवायचे आहे.पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. (Post Office RD Scheme)
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना ही सुरक्षित आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर सरकार तुम्हाला सरकार सुरक्षा देते. या योजनेत तुम्ही जर कोणत्याही महिन्यात पैसे जमा केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही १०० रुपये भरुनदेखील खाते उघडू शकतात. या योजनेत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडू शकतात. या योजनेत तुम्हाला ६.८ टक्के व्याज मिळते. तसेच चक्रवाढ व्याजदेखील मिळते. या योजनेत चांगला परतावा मिळतो. (Post Office Reccurring Deposit Scheme)
या योजनेत जर तुम्ही दर दिवशी ३३३ रुपये गुंतवतात म्हणजे महिन्याला १०,००० रुपये गुंतवतात. याचाच अर्थ तुम्ही वर्षाला १.२० लाख रुपये गुंतवतात. ५ वर्षानंतर तुम्ही ५,९९,४०० रुपये जमा करणार आहे. यावर ६.८ टक्के व्याजदर म्हणजेच तुम्हाला १,१५,४२७ रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला १,१५,४२७ रुपये व्याज मिळणार आहे. यामुळे तुमची एकूण रक्कम ७,१४,८२७ रुपये होणार आहे.
या योजनेत मॅच्युरिटी पीरियडनंतरही तुम्ही पैसे गुंतवू शकतात. तुम्ही १० वर्षांसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यात तुम्ही १२,००,००० रुपये जमा करणार आहेत. त्यावर तुम्हाला ५,०८,५४६ रुपये व्याज मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला दहा वर्षानंतर १७,०८,५४६ रुपये मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.