Kia Carens And Toyota Rumion  Saam Tv
बिझनेस

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

7 seater cars: भारतीय बाजारात सेव्हन सीटर कारची मोठी मागणी आहे. या कोर्समध्ये चांगले इंटिरियर आणि अधिक जागेसह आरामदायी राइड करता येते. Kia Carens आणि Toyota Rumion या बाजारात अशाच दोन कार्स आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Kia Carens And Toyota Rumion:

भारतीय बाजारात सेव्हन सीटर कारची मोठी मागणी आहे. या कोर्समध्ये चांगले इंटिरियर आणि अधिक जागेसह आरामदायी राइड करता येते. Kia Carens आणि Toyota Rumion या बाजारात अशाच दोन कार्स आहेत. या दोन्ही कार्समध्ये ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्ससह स्टायलिश फ्रंट ग्रिल आहे. ही पॉवरफुल एसयूव्ही टॉप व्हेरियंटमध्ये एलईडी लाइट्स आणि अलॉय व्हीलसह येते. दोन्ही कार्सची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊ...

Kia Carens

ही 7 सीटर कार आहे, ज्यामध्ये C शेप एलईडी टेललाइट्स आहेत. कारमध्ये पॉवरफुल 1.5 लिटर इंजिन आहे. ही कार 10.51 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत ऑफर केली जात आहे. ही कार 160 PS ची पॉवर आणि 253 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. कारचे टॉप मॉडेल 24.36 लाख रुपयांच्या ऑन रोड किमतीत उपलब्ध आहे.

लवकरच कंपनी याचे नवीन अपडेटेड व्हर्जन आणणार आहे. मोठ्या आकाराच्या या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन देण्यात आले आहेत. कारमध्ये 10.25-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे.

Toyota Rumion

Toyota Rumion 10.44 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. कार 1.5-लिटर पेट्रोल इंजिनसह येते. कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम (ADAS) सारखे सेफ्टी फीचर्स आहेत. ही कार 6 स्पीड गिअरबॉक्ससह येते. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही आहेत.

कारमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, ही कार 103 पीएस पॉवर जनरेट करते. कारमध्ये चाइल्ड अँकरेज आणि मागील सीटवर सीट बेल्ट रिमाइंडरचे फीचर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology Tips: ६ मूलांक असलेल्या लोकांसाठी शुभ रत्नजडित अंगठी कोणती घालावी?

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Asia Cup 2025: एशिया कपमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान; 'या' दिवशी रंगणार हायव्होल्टेज सामना

Crime : लग्न करण्यासाठी भारतात आली अन् अनर्थ घडला, NRI महिलेची हत्या करुन जाळलं

GST New Rates : ४ दिवसात मोठा बदल, जीएसटी कपातीचं नोटिफिकेशन निघालं, वाचा कोणकोणत्या वस्तू स्वस्त होणार

SCROLL FOR NEXT